OnePlus ब्रँडचा फोन फक्त 9099 रुपयांमध्ये? अर्ध्या किंमतीत नवा कोरा 5G Smartphone
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 03:51 PM2022-04-30T15:51:38+5:302022-04-30T15:51:48+5:30
OnePlus Nord CE 2 Lite आजपासून विकत घेता येणार आहे. पहिल्याच सेलमध्ये या डिवाइसची किंमत अर्धी झाली आहे.
OnePlus नं काही दिवसांपूर्वी आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात सादर केला होता. आज त्याच OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनचा पहिला सेल आहे. जरी या मोबाईलची मूळ किंमत 20 हजारांच्या घरात असली तरी आज हा अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत विकत घेण्याची संधी मिळत आहे. 8GB RAM, Qualcomm Snapdragon 695 चिपसेट, 64MP कॅमेरा आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग वर शानदार ऑफर्स दिल्यात जात आहेत.
किंमत आणि लाँच ऑफर
वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट 5जी फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते, ज्याची किंमत फक्त 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 21,999 रुपये आहे. यावर एसबीआय क्रेडिट धारकांना 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येईल.
तसेच या फोनवर 10,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट देखील आहे. त्यामुळे जर तुम्ही चांगल्या कंडिशनमध्ये असलेला योग्य जुना स्मार्टफोन दिला तर तुम्ही ही सूट मिळवू शकता. त्यामुळे 20 हजारांच्या आसपास किंमत असलेला बेस व्हेरिएंट तुम्ही फक्त 9,099 रुपयांमध्ये तुमच्या घरी आणू शकता.
OnePlus Nord CE 2 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित आक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह यात साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपची जबाबदारी डिवाइसमधील 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगच्या मदतीनं सांभाळते.
वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट मध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.