Google Android 14 Update: अँड्रॉईड १४ साठी तयार रहा! फोटो व्हिडीओ गॅलरीसाठी जबरदस्त फिचर, अन् बरेच काही पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 08:45 AM2023-03-12T08:45:37+5:302023-03-12T08:46:07+5:30

सध्या अनेकांच्या मोबाईलमध्ये अँड्रॉईड १३ आहे. मार्चमध्ये आलेल्या डेव्हलपर्स प्रीव्ह्यूनंतर, कंपनी एप्रिलमध्ये पहिला बीटा रिलीज करू शकते

Get Ready for Android 14! Amazing features for photo video gallery, and more... | Google Android 14 Update: अँड्रॉईड १४ साठी तयार रहा! फोटो व्हिडीओ गॅलरीसाठी जबरदस्त फिचर, अन् बरेच काही पहा...

Google Android 14 Update: अँड्रॉईड १४ साठी तयार रहा! फोटो व्हिडीओ गॅलरीसाठी जबरदस्त फिचर, अन् बरेच काही पहा...

googlenewsNext

गुगलनेअँड्रॉईड १४ चा नवीन डेव्हलपर्स प्रीव्ह्यू जारी केला आहे. हा कंपनीकडून आलेला दुसरा प्रीव्ह्यू आहे. यामध्ये अनेक प्रकारचे फिचर्स पहायला मिळत आहेत. नवीन अपडेट ही चांगली प्रायव्हसी, सुरक्षा आणि परफॉर्मन्स देत आहे. म्हणजेच येत्या काही महिन्यांत येणाऱ्या Android 14 मध्ये तुम्हाला या गोष्टी मिळणार आहेत. 

सध्या अनेकांच्या मोबाईलमध्ये अँड्रॉईड १३ आहे. या नव्या अपडेटमध्ये टॅब्लेट आणि फोल्ड होणाऱ्या मोबाईलमध्ये चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मार्चमध्ये आलेल्या डेव्हलपर्स प्रीव्ह्यूनंतर, कंपनी एप्रिलमध्ये पहिला बीटा रिलीज करू शकते, जो पुढील तीन महिन्यांसाठी व्हॅलिड राहील. यानंतर कंपनी बग्स दुरुस्त करून फायनल व्हर्जन लाँच करू शकते, जे स्थिर असेल. 

Android 14 च्या Developers Preview 2 मध्ये एक खास फिचर दिसले आहे. ते म्हणजे गॅलरी सरसरकट सर्वांसाठी खुली राहणार नाही किंवा काही फोटो व्हॉल्टमध्ये ठेवण्याचे फिचर्स आता जुने झाले आहे. युजर त्याला हव्या तेवढ्याच फोटोंचा अॅक्सेस इतरांना देऊ शकणार आहे. थोडेफार व्हॉल्टसारखेच हे फिचर आहे, परंतू ते आता दुसऱ्या बाजुने काम करणार आहे. 

सध्या एखाद्या अॅपला किंवा फोटो, व्हिडीओचा अॅक्सेस दिल्याने सारे काही दिसत होते. आता दुसऱ्यांना दाखवायचे आहे, तेच फोटो, व्हिडीओ पाहता येणार आहेत. क्रेडेन्शियल मॅनेजरमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. अधिक चांगले UI दिसत आहे. सुधारित Android मेमरी व्यवस्थापन प्रणाली देण्यात आली आहे. तुम्ही भारतात रहात असाल तर इथे तापमान सेल्सिअसमध्ये दिसेल, तर युरोपातील लोकांना फॅरेनहाइटमध्ये तापमान दिसेल, अशी फिचर्सही देण्यात आली आहेत. 

सध्या हे अपडेट्स सामान्य युजर्ससाठी नसून ते डेव्हलपर्स आणि टेस्टर्ससाठी आहेत. गुगलच्या प्रोग्रॅमसाठी बरेचजण काम करतात, काही फुकटात काम करतात. ते गुगलला बग, बदल, दुरुस्तीबाबत कळवितात आणि त्यानंतर त्यात योग्य बदल करून ते बीटा आणि नंतर फायनल व्हर्जनमध्ये येते. 

Web Title: Get Ready for Android 14! Amazing features for photo video gallery, and more...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.