48MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरीसह मजबूत Gigaset GS5 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: November 1, 2021 07:01 PM2021-11-01T19:01:59+5:302021-11-01T19:02:05+5:30
Gigaset GS5 हा एक रगेड स्मार्टफोन आहे जो कंपनीने रिमूव्हेबल बॅटरीसह मिड-रेंजमध्ये सादर केला आहे. यात 4GB RAM, 4500mAh बॅटरी आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते.
सध्या स्मार्टफोनमधील बॅटरी सामान्य युजरला बदलता येत नाही. त्यामुळे काही वर्ष स्मार्टफोन वापरल्यानंतर युजरला नव्या बॅटरीसाठी सर्व्हिस सेंटर गाठावे लागते. परंतु काही कंपन्या याला अपवाद आहेत. असाच एक रिमूव्हेबल बॅटरी असलेला Gigaset GS5 स्मार्टफोन युरोपात सादर करण्यात आला आहे. हे एक मजबूत बॉडी असलेला रगेड स्मार्टफोन आहे जो मिड-रेंज,ऍडजे सादर करण्यात आला आहे.
Gigaset GS5 ची किंमत
युरोपियन बाजारात Gigaset GS5 ची किंमत 229 युरो ठेवण्यात आली आहे. ही किंमत 20,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन डार्क टाइटेनियम ग्रे आणि लाईट पर्पल कलरमध्ये विकत घेता येईल.
Gigaset GS5 चे स्पेसिफिकेशन्स
Gigaset GS5 मध्ये 6.3 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉचसह सादर करण्यात आला आहे. या फोनला मीडियाटेक हीलियो जी85 ची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. हे एक ड्युअल-सिम फोन आहे जो Android 11 वर चालतो आणि लवकरच Android 12 वर अपडेट होईल.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. हा मोबाईल 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 4500mAh ची रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.