फक्त 6,250 रुपयांमध्ये हुबेहूब iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन
By सिद्धेश जाधव | Published: January 29, 2022 12:31 PM2022-01-29T12:31:21+5:302022-01-29T12:32:44+5:30
Gionee 13 Pro: Gionee नं अगदी हुबेहूब iPhone 13 च्या डिजाईनसह Gionee 13 Pro स्मार्टफोन सादर केला आहे. ज्यात ड्युअल कॅमेरा, 4GB रॅम आणि Harmony OS देण्यात आला आहे.
Gionee 13 Pro स्मार्टफोन बाजारात आला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये Apple iPhone 13 ची डिजाईन दिली आहे. विशेष म्हणजे यात अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम देखील देण्यात आली नाही. Gionee 13 Pro हँडसेट HarmonyOS वर चालतो, जो हुवावेनं डेव्हलप केला आहे. सोबत यात 4GB RAM आणि 13MP रियर कॅमेरा असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.
Gionee 13 Pro चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 13 प्रमाणे Gionee 13 Pro मध्ये देखील फ्लॅट मिळतात. डिवाइसच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि लाल रंगाचा पॉवर बटन देण्यात आला आहे. यात 6.26 इंचाचा एचडी+ LCD पॅनल देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 19:9 आस्पेक्ट रेशियो, 90.3 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियोसह बाजारात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13MP चा मुख्य कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
फोनमध्ये Unisoc T310 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. पॉवर बॅकअपसाठी यात 3,5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी USB-C पोर्टनं चार्ज करत येईल. हा फोन HarmonyOS वर चालतो. यात सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर मिळत नाही. कंपनीनं यात फेस अनलॉक फिचर मात्र दिलं आहे.
Gionee 13 Pro ची किंमत
Gionee 13 Pro च्या बेस व्हेरिएंटची किंमत 529 युआन (जवळपास 6242 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन Deep Sea Blue, Glow Gold, Brilliant Purple आणि Graphite Black कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं गेल्या काही वर्षात चीनच्या बाहेर स्मार्टफोन सादर केले नाहीत. त्यामुळे जगभरातील ग्राहक एवढ्या स्वस्तात आयफोनचा अनुभव घेऊ शकणार नाहीत, असं दिसतंय.
हे देखील वाचा:
Redmi चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन करणार शानदार एंट्री; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...