Gionee नं लाँच केला 4 कॅमेरा, 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन; किंमत 11 हजारपेक्षाही कमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:38 PM2021-12-31T19:38:54+5:302021-12-31T19:39:02+5:30

Gionee Ti13 स्मार्टफोन HD+ डिस्प्ले, मीडियाटेकचा Helio P60 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच केला गेला आहे. या फोनची किंमत कंपनीनं बजेटमध्ये ठेवली आहे.

Gionee ti13 launched with mediatek helio p60 and 5000mah battery  | Gionee नं लाँच केला 4 कॅमेरा, 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन; किंमत 11 हजारपेक्षाही कमी  

Gionee नं लाँच केला 4 कॅमेरा, 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन; किंमत 11 हजारपेक्षाही कमी  

Next

Gionee ने चीनमध्ये नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन Gionee Ti13 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन HD+ डिस्प्ले, मीडियाटेकचा Helio P60 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच केला गेला आहे. या फोनची किंमत कंपनीनं बजेटमध्ये ठेवली आहे. चला जाणून घेऊया Gionee Ti13 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत. 

Gionee Ti13 ची किंमत 

Gionee Ti13 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट चीनमध्ये आले आहेत. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हर्जन 899 युआन (अंदाजे 10,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर 6GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटसाठी 1,099 युआन (सुमारे 12,800 रुपये) मोजावे लागतील.  

Gionee Ti13 चे स्पेसिफिकेशन्स 

Gionee Ti13 स्मार्टफोनमध्ये 6.53-इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन MediaTek के ऑक्टा कोर Helio P60 प्रोसेसरसह सादर करण्यात आहे. त्याचबरोबर 6GB RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज microSD कार्डनं वाढवता येते. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

Gionee Ti13 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 16MP चा मुख्य कॅमेरा, 5MP सेकंडरी सेन्सर आणि 2MP चा थर्ड सेन्सर आहे. हा फोन 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

हे देखील वाचा: 

नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढविणार; मोबाईलवर बोलणे महागणार

WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर

Web Title: Gionee ti13 launched with mediatek helio p60 and 5000mah battery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.