कुठेही ऐका दणकट आवाजात गाणी; भारतात ‘या’ कंपनीचे खिशाला परवडणारे ट्रॉली स्पिकर्स सादर

By सिद्धेश जाधव | Published: April 14, 2022 03:05 PM2022-04-14T15:05:55+5:302022-04-14T15:06:37+5:30

Gizmore कंपनीनं भारतात आपले किफायतशीर ट्रॉली स्पिकर्स लाँच केले आहेत. ज्यांची किंमत 4000 रुपयांपासून सुरु होते.  

Gizmore Announces Make In India Affordable Trolley Speakers  | कुठेही ऐका दणकट आवाजात गाणी; भारतात ‘या’ कंपनीचे खिशाला परवडणारे ट्रॉली स्पिकर्स सादर

कुठेही ऐका दणकट आवाजात गाणी; भारतात ‘या’ कंपनीचे खिशाला परवडणारे ट्रॉली स्पिकर्स सादर

Next

Gizmore नं भारतात आपले नवीन किफायतशीर ट्रॉली स्पिकर्स सादर केले आहेत. WHEELZ T1501 N आणि T1000 PRO नावाचे हे स्पिकर्स तुम्ही कुठेही तुमच्यासोबत नेऊ शकता. यासाठी या स्पिकर्सना व्हील्स जोडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या स्वस्त स्पिकर्स कंपनीनं भारतात बनवले आहेत. तसेच हे स्पिकर्स खास पार्टी करण्यासाठी डिजाईन करण्यात आले आहेत.  

डिजाईन पाहता, या स्पिकर्सची डिजाईन खूप साधी आहे, मोठ्या ब्रँड्सच्या स्पिकर्स सारखे हे स्पीकर दिसतात. स्पिकर्सच्या तळाला Gizmore ची ब्रॅंडिंग दिसते. यात एक एलईडी लाईट देण्यात आली ते जी खोलीत एक वेगळाच माहोल निर्माण करते.  

Gizmore WHEELZ T1501 N स्पिकरची किंमत 5,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Gizmore T1000 PRO ची किंमत 3,999 रुपये आहे. दोन्ही स्पिकर्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेजॉन इंडियावरून विकत घेता येतील.  

Gizmore Wheelz T1501N स्पिकर्समध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. तसेच हे टॅब कंट्रोल्सच्या माध्यमातून नियंत्रित करता येतात. स्पिकर्समध्ये 8-इंचाचा सबवूफर आहे आणि 20W चे स्पीकर ऑडिओ आऊटपुट देतात.  यातील रिमोट कंट्रोल फिचर आणि वायरलेस म्युजिक प्लेयिंग फिचर खूप महत्वाचे आहेत. यात पावर बॅकअपसाठी 3600mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी फुल चार्जवर 4 तासांचा म्युजिक प्लेबॅक टाइम देते. 

याव्यतिरिक्त Wheelz T1000 Pro स्पीकरमध्ये अनेक ऑडिओ सेटिंग्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हाय क्वॉलिटी ऑडिओ घरात आणि घराबाहेर देखील मिळतो. हे स्पिकर्स पावर बँकच्या मदतीनं किंवा यूएसबी केबल वापरून देखील चार्ज करता येतात. या स्पिकर्स सोबत माईक देखील देण्यात आला आहे. यातील 2200mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर चार तास म्युजिक टाइम देते.  

Web Title: Gizmore Announces Make In India Affordable Trolley Speakers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.