अँड्रॉइड युझर्सना अलर्ट! पुढच्या महिन्यापासून या स्मार्टफोन्समध्ये Gmail, Youtube होणार बंद, असं आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 10:14 AM2021-08-04T10:14:19+5:302021-08-04T10:16:59+5:30

गुगल अहवालात असेही म्हणण्यात आले आहे, की एखाद्या युझरने त्याच्या फोनमध्ये नवीन Google खाते तयार केले किंवा फोन फॅक्टरी रीसेट केला, तरीही उपयोग होणार नाही... (Smartphones)

Gmail and youtube will not support these smartphones know the reason | अँड्रॉइड युझर्सना अलर्ट! पुढच्या महिन्यापासून या स्मार्टफोन्समध्ये Gmail, Youtube होणार बंद, असं आहे कारण 

अँड्रॉइड युझर्सना अलर्ट! पुढच्या महिन्यापासून या स्मार्टफोन्समध्ये Gmail, Youtube होणार बंद, असं आहे कारण 

googlenewsNext

नवी दिल्ली - जर आपण अँड्रॉइड युजर्स असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी नाही. कारण, टेक गूगल आता 2.3.7 किंवा जे फोन यापेक्षा लोवर व्हर्जनवर काम करतात, त्यांना साइन-इन सपोर्ट करणार नाही. यासंदर्भात गुगलने युझर्सना मेल पाठवून माहिती दिली आहे. या मेलवरून समजते, की येणाऱ्या 27 सप्टेंबरपासून गुगल या स्मार्टफोन्सना सपोर्ट करणार नाही. (Gmail and youtube will not support these smartphones know the reason)

करावे लागेल अपडेट -
गुगलने म्हटले आहे की, सप्टेंबरनंतर, युझर्सना गुगल अ‍ॅप्स वापरायचे असतील, तर त्यांना किमान अँड्रॉइड 3.0 हनीकॉम्बमध्ये अपडेट करावे लागेल. यामुळे फोनमध्ये अ‍ॅप लेव्हल साईन-इनवर परिणाम होईल. मात्र, युझर्सना आपल्या फोनच्या ब्राउझरच्या माध्यमाने Gmail, Google Search, Google Drive, Youtube मध्ये साईन-इन करावे लागेल.

फार कमी युझर्स होतील प्रभावित -
अहवालानुसार, गुगल आपल्या युझर्सच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलत आहे. तसेच, अहवालात असेही म्हणण्यात आले आहे, की याचा फटका फार कमी युझर्सना बसेल. कारण फार कमी युझर्स असे जुने अँड्रॉइड व्हर्जन वापरतात. गूगलने म्हटल्याप्रमाणे, येत्या 27 सप्टेंबरपासून, युझर्स अँड्रॉइड व्हर्जन 2.3.7 अथवा त्याहून कमी व्हर्जन असलेला फोन वापरत असतील, तर Google अ‍ॅपमध्ये साईन-इन केल्यानंतर त्यांना स्क्रीनवर ‘username अथवा password error’ असा मेसेज दिसेल.
 
Reset करूनही चालणार नाही -
गुगल अहवालात असेही म्हणण्यात आले आहे, की एखाद्या युझरने त्याच्या फोनमध्ये नवीन Google खाते तयार केले किंवा फोन फॅक्टरी रीसेट केला, तरीही त्याच्या फोनच्या स्क्रीनवर Error मेसेजच लिहिलेला येईल. एवढेच नाही, तर युझरने नवा पासवर्ड तयार केला आणि पुन्हा साईन इन केले तरी ते काम करणार नाही.

Web Title: Gmail and youtube will not support these smartphones know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.