Gmail चं 16 व्या वर्षात पर्दापण, गुगलने युजर्सना दिलं खास गिफ्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 10:59 AM2019-04-02T10:59:13+5:302019-04-02T11:01:17+5:30

16 व्या वर्षात पदार्पण करताना गुगलने जीमेल युजर्ससाठी काही खास फीचर्स आणले आहेत. युजर्ससाठी जीमेलला आणखी अपडेट करण्यात आलं आहे.

Gmail Completed 15 years today | Gmail चं 16 व्या वर्षात पर्दापण, गुगलने युजर्सना दिलं खास गिफ्ट 

Gmail चं 16 व्या वर्षात पर्दापण, गुगलने युजर्सना दिलं खास गिफ्ट 

नवी दिल्ली - ईमेलच्या दुनियेत लोकप्रिय असणाऱ्या जीमेलला आज 1 एप्रिल 2019 रोजी 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. जगातील इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलकडून जीमेल ही सेवा ग्राहकांना पुरवली जाते. गुगलच्या पॉल बुकेट याने 1 एप्रिल 2004 रोजी जीमेल हे अ‍ॅप्लीकेशन लाँच केले होते. त्यासोबत अनेक फीचर्सदेखील जीमेलसोबत देण्यात आले होते. 15 जीबीपर्यंत फ्री स्टोरेज डेटा सुविधा जीमेलच्या ग्राहकांना देण्यात आली होती. आता जगभरात 150 करोडपेक्षा अधिक जीमेलचे युजर्स आहेत. जीमेलमध्ये 50 एमबीपर्यंतच्या फाईल्स जोडल्या जाऊ शकतात. गुगलकडून देण्यात आलेली ही सेवा सामान्य युजर्ससाठी पूर्णपणे मोफत आहे. तर काही कंपन्यांकडून ही सेवा पेड स्वरुपात घेतली आहे. 

16 व्या वर्षात पदार्पण करताना गुगलने जीमेल युजर्ससाठी काही खास फीचर्स आणले आहेत. युजर्ससाठी जीमेलला आणखी अपडेट करण्यात आलं आहे. त्याला न्यू जीमेल असंही बोलू शकता. या न्यू जीमेलला गुगलने आणखी नवीन फीचर जोडले आहेत. त्याचसोबत आर्टिफिशियल इंटेलिजेंससारखे नवीन टूल्सचा समावेशही केला आहे. 

जीमेल युजर्ससाठी गुगलने नवीन स्मार्ट कंपोज फिचर आणले आहे त्यामुळे युजर्सकडून पाठवण्यात येणाऱ्या ईमेलला गती मिळणार आहे. गूगलचा हा फिचर युजर्सला एखादं वाक्य पूर्ण करण्यासाठी मदत करणार मिळणार आहे. तसेच ऑफलाईन फीचरने इंटरनेट नसतानाही तुम्ही ईमेल पाठवू शकता अशी सुविधा दिली आहे. तर Nudge फीचरमधून गुगलद्वारे युजर्स रिमाईंडर देण्यात येईल की तुम्ही कोणता ईमेल वाचला नाही अथवा कोणत्या ईमेलला रिप्लाय केला नाही.  

तसेच आणखी एक फीचर देण्यात आले आहे ज्यामध्ये एखाद्याला ईमेल पाठवण्याचा वेळ तुम्हाला ठरवता येणार आहे. उदा. समजा, तुम्ही एखादा ईमेल ड्राफ्ट केला तो मेल तुम्हाला आता लगेच नाही तर दुसऱ्या दिवशी अथवा काही तासानंतर पाठवायचा असेल तर त्यासाठी जीमेलमध्ये शेड्युल्ड फीचर जोडण्यात आले आहे. त्यामुळे ठराविक दिवशी तुम्हाला एक ईमेल पाठवायचा आहे तो लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही मेल टाइप करुन शेड्युल्ड करा त्यानंतर गुगल ऑटो-जनरेट सिस्टीमने तुमचा ईमेल शेड्युल्ड केलेल्या वेळेला पाठवून देईल. 

Web Title: Gmail Completed 15 years today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.