Google चा इशारा, AI द्वारे २५० कोटी युजर्सचे जीमेल अकाउंट हॅक होऊ शकते, हे काम त्वरित करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:09 IST2025-02-03T13:18:43+5:302025-02-03T15:09:54+5:30

गुगल सपोर्टच्या नावाने युजर्सना कॉल करून सायबर गुन्हेगार ही मोठी फसवणूक करत आहेत.

Gmail confirms AI hacking, warns its 2.5 billion users | Google चा इशारा, AI द्वारे २५० कोटी युजर्सचे जीमेल अकाउंट हॅक होऊ शकते, हे काम त्वरित करा

Google चा इशारा, AI द्वारे २५० कोटी युजर्सचे जीमेल अकाउंट हॅक होऊ शकते, हे काम त्वरित करा

जवळपास २५० कोटी युजर्सचे जीमेल (Gmail) अकाउंट एआयद्वारे (AI) हॅक केले जाऊ शकते. याला आता गुगलने (Google) सुद्धा दुजोरा दिला आहे. दरम्यान, गुगल सपोर्टच्या नावाने युजर्सना कॉल करून सायबर गुन्हेगार ही मोठी फसवणूक करत आहेत. त्यामुळे गुगलने युजर्सना अशा कोणत्याही बनावट कॉलवर विश्वास ठेवू नका आणि आपल्या जीमेल अकाउंटचा पासवर्ड लगेच रिसेट करा, असा इशारा दिला आहे.

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, गुगलने जीमेल युजर्सना इशारा दिला आहे की, सायबर गुन्हेगार गुगल सपोर्टच्या नावाने कॉल करत आहेत. सायबर गुन्हेगारांनी वापरलेला कॉलर आयडी पूर्णपणे खरा असल्याचे दिसून येतो, ज्यामुळे युजर्स त्यांच्या जाळ्यात अडकतात. 

हॅकर्स जीमेल युजर्सना गुगल सपोर्ट एजंट्सच्या नावाने कॉल करतात आणि त्यांना सांगतात की, त्यांचे अकाउंट हॅक झाले आहे आणि त्यांनी त्यांच्या ई-मेलवर मिळालेल्या रिकव्हरी कोडचा वापर करून अकाउंट रिकव्हर करावे. एवढेच नाही तर हॅकर्सनी पाठवलेला ईमेल आणि रिकव्हरी कोड देखील खरा वाटतो.

'हे' काम लगेच करा...
- जर तुम्हालाही असा कोणताही ईमेल किंवा कॉल आला तर त्याकडे दुर्लक्ष करा.
- जर तुम्ही हॅकर्सनी पाठवलेल्या रिकव्हरी कोडचा वापर करून चुकून तुमचे अकाउंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तुम्ही ताबडतोब तुमचे जीमेल अकाउंट रीसेट करावे.
- एवढेच नाही तर, तुमच्या जीमेल अकाउंटला नेहमी टू-फॅक्टर ऑथेटिकेशनद्वारे प्रोटेक्ट करा, जेणेकरून तुमचे अकाउंट आणखी सुरक्षित होईल.
- युजर्सच्या ईमेल अकाउंटा अॅक्सेस मिळविण्यासाठी सायबर गुन्हेगार सतत अशा ट्रिक्स अवलंबत आहेत. हॅकर्सच्या या ट्रिक्स देखील प्रभावी आहेत, कारण यामध्ये त्यांना कोणत्याही सिक्योरिटी कंट्रोलला बायपास करण्याची आवश्यकता नसते.

जीमेल पासवर्ड कसा रीसेट करायचा?
- जीमेल पासवर्ड रीसेट करण्यासाठी, तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवरील सेटिंग्जमध्ये जा.
- यानंतर गुगलवर जा, तुमचे नाव टाइप करा, नंतर तुमचे गुगल अकाउंट मॅनेज करा किंवा ऑप्शनवर टॅप करा.
- सर्वात वरती सिक्योरिटीवर टॅप करा.
- त्यानंतर तुमच्या गुगल अकाउंटमध्ये तुम्हाला येथे साइन इन करावे लागू शकते.
- नंतर तुमचा नवीन पासवर्ड एंटर करा. त्यानंतर, पासवर्ड चेंजवर टॅप करा.
- जर तुम्हाला तुमच्या जीमेल अकाउंटचा पासवर्ड माहित नसेल तर फॉरगेट माय पासवर्ड या ऑप्शनवर टॅप करा. यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि सिक्योरिटी प्रश्नांची उत्तरे द्या. यानंतर तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंटचा पासवर्ड बदलू शकाल.

Web Title: Gmail confirms AI hacking, warns its 2.5 billion users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.