Gmail चा वापर करता? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:45 PM2019-09-23T15:45:52+5:302019-09-23T15:48:22+5:30

Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असलेल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात.

gmail tips and tricks you might not be knowing about features | Gmail चा वापर करता? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Gmail चा वापर करता? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Next

नवी दिल्ली - Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असलेल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात. जीमेलच्या अनेक फीचरची सर्वसामान्यांना माहिती नाही. अनेकजण केवळे ईमेल, अटॅचमेंट पाठवण्यासाठी आणि रिसीव्ह करण्यासाठी फक्त जीमेलचा वापर करतात. 

गुगल कॅलेंडर 

Gmail चा वापर हा रोज केला जातो. तारखा आणि दिवस लक्षात राहत नसेल तर गुगल कॅलेंडर हे फीचर अत्यंत फायदेशीर आहे. हे फीचर जीमेल अकाऊंटसोबत जोडता येतं. यासाठी सेटिंग लॅब्समध्ये जाऊन त्यामध्ये गुगल कॅलेंडरमध्ये जाऊन एनेबल करा. त्यानंतर सेव्ह चेंजेसवर जाऊन क्लिक करा. अलाऊ केल्यानंतर  गुगल कॅलेंडर युजर्सना इनबॉक्समध्ये दिसेल. 

ई-मेल शेड्यूल करा

ई-मेल शेड्यूल करता येतो. यासाठी https://www.boomeranggmail.com/  ची मदत घ्यावी लागेल. यामध्ये युजर्स ईमेल ड्राफ्ट करून पाठवण्याची वेळ निश्चित करा. मात्र यासाठी बूमरँग  जीमेल इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर युजर Send Later बटण येईल.

know how to automatically delete emails from gmail inbox using email studio | Gmail इनबॉक्समधील नको असलेले ईमेल होणार ऑटोमॅटीक डिलीट, जाणून घ्या कसं

 Gmail नोटिफिकेशन ऑन करा

जीमेल युजर्सने मेलबाबत नोटिफिकेशन हवं असल्यासं Gmail नोटिफिकेशन ऑन करा. यासाठी सेटिंग-जनरल-डेस्कटॉप नोटिफिकेशन ऑन करा. नको असल्यास ते ऑफ देखील करता येते. 

थीम बदला 

जीमेलचा वापर कामासाठी रोज केला जातो. मात्र दररोज एकच रंग आणि डिझाईन पाहून कंटाळा येतो. यासाठी 'सेटिंग - थीम्स - सेट थीम' मध्ये जा आणि हवी असलेली थीम निवडा. 

know how to send extra secure email via gmail with the help of confidential mode | Gmail मध्ये आला Confidential Mode, आता असा पाठवा सिक्रेट ई-मेल

मोठी फाईल पाठवा

जीमेलमध्ये  25 एमबीपर्यंत डेटा पाठवला जातो. मात्र त्यापेक्षाही जास्त डेटा पाठवण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. गुगल ड्राईव्हच्या मदतीने 10 जीबीपर्यंत फाईल्स पाठवता येतात. गुगल ड्राईव्हवर क्लिक करून फाईल निवडा आणि ईमेलच्या माध्यमातून अटॅच करून रिसीव्हरला पाठवा.

एकाच वेळी एका पेक्षा अधिक अकाऊंटचा वापर 

युजर्स एकाच वेळी एका पेक्षा अधिक अकाऊंटचा वापर करू शकतात. यासाठी प्रोफआईल आयकॉनवर क्लिक करा. यामध्ये अ‍ॅड अकाऊंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. आयडी आणि पासवर्ड टाकून एका पेक्षा अधिक अकाऊंटचा वापर करता येतो. 

 

Web Title: gmail tips and tricks you might not be knowing about features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.