तुमचा फोन मित्राला पाठविणार शुभेच्छा, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 05:25 AM2024-06-30T05:25:07+5:302024-06-30T05:25:51+5:30
ॲपल, मायक्रोसॉफ्ट व गुगल हे एआय अर्थात कृत्रिमरीत्या बुद्धिमान स्मार्टफोन आणि संगणक बाजारात आणणार आहेत.
नवी दिल्ली : ॲपल, मायक्रोसॉफ्ट व गुगल हे एआय अर्थात कृत्रिमरीत्या बुद्धिमान स्मार्टफोन आणि संगणक बाजारात आणणार आहेत. हे स्मार्टफोन आणि संगणक तुमचे फोटो ऑटोमॅटिक एडिट करतीलच शिवाय तुमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतील.
मात्र, हे करण्यासाठी कंपन्यांना आणखी डेटा लागणार आहे. या नवीन तंत्रज्ञानात तुमच्या संगणकाची विंडो तुम्ही जे काही स्क्रिनवर करत आहात, त्या प्रत्येक गोष्टीचा काही सेकंदांनी स्क्रीनशॉट घेईल. आयफोन तुम्ही वापरत असलेल्या अनेक ॲप्सवर माहिती एकत्र जोडेल. याशिवाय अँड्रॉइड फोन घोटाळ्याची सूचना देण्यासाठी रिअल टाइममध्ये कॉल ऐकू शकतो.