Good News : पुढील आठवड्यापासून iPhone युझर्सना मिळणार 5G नेटवर्क, जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:47 PM2022-11-03T12:47:39+5:302022-11-03T12:48:11+5:30

एअरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी गेल्या महिन्यात भारतातील काही शहरांमध्ये 5G सेवांची सुरूवात केली होती.

Good News Apple iphone users will get 5G network from next week know how | Good News : पुढील आठवड्यापासून iPhone युझर्सना मिळणार 5G नेटवर्क, जाणून घ्या कसं

Good News : पुढील आठवड्यापासून iPhone युझर्सना मिळणार 5G नेटवर्क, जाणून घ्या कसं

Next

Apple 5G Service Update : भारतात आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात 5G कनेक्टिव्हिटीसह हँडसेट चालवणार्‍यांना पुढील आठवड्यापासून 5G सॉफ्टवेअर अपडेट मिळणार आहे. एअरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी गेल्या महिन्यात भारतातील काही शहरांमध्ये 5G सेवांची सुरूवात केली होती. अशा परिस्थितीत ज्या लोकांकडे 5G हँडसेट आहेत, त्यांना अपडेटची आवश्यकता असेल. या अपडेटनंतर, त्यांचे डिव्हाइस भारतीय 5G शी कंपॅटिबल असतील.

Apple मध्ये 5G सेवा अनेबल करण्यासाठी, iOS 16 मधील बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होईल. यानंतर, Airtel आणि Jio ग्राहकांना कोणत्याही iPhone 14, iPhone 13 सीरिज, iPhone 12 सीरिज, iPhone SE (3rd जनरेशन) मॉडेलसाठी हे 5G अपडेट मिळेल. त्यानंतर ग्राहतांना 5G सेवांचा लाभ घेता येईल.

बीटा प्रोग्रॅम अंतर्गत अपडेट
ॲपल बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम अंतर्गत, ग्राहकांना प्री-रिलीझ सॉफ्टवेअर मिळेल, त्यानंतर त्यांना नव्या फीचरचा अनुभव घेता येईल. यानंतर, ग्राहकांना 5G सेवांचा लाभ मिळेल. या काळात ग्राहकांना 5G सेवांचा वापर करतानाही काही समस्या येत आहेत किंवा नेटवर्क स्टेबिलिटीमध्ये काही समस्या येत आहेत का याचीही माहिती देता येईल.

रजिस्टर करावं लागणार
Apple चे हे बीटा व्हर्जन वापरण्यासाठी यूजर्सना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यानंतर त्यांना लेटेस्ट पब्लिक बीटा व्हर्जन वापरता येईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या 5G सेवांचा या अपडेटनंतर वापर करता येईल. बीटा व्हर्जनसाठी नोंदणी करण्यासाठी ग्राहकांना beta.apple.com ला भेट द्यावी लागे. तसेच बीटा आवृत्तीशी संबंधित अटी जाणून घेण्यासाठी https://beta.apple.com/sp/betaprogram/faq ला भेट द्या.

Web Title: Good News Apple iphone users will get 5G network from next week know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.