अँड्रॉईडधारकांसाठी गुड न्यूज! चॅट जीपीटीसाठी प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात, असे करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 05:57 PM2023-07-23T17:57:10+5:302023-07-23T17:57:33+5:30

ChatGPT डेव्हलपर्स ओपन एआयने या बाबत एक ट्विट केले आहे. चॅट जीपीटी नुकतेच गुगल प्ले स्टोअरवर लिस्ट करण्यात आले आहे.

Good news for Android users! To start pre-registration for Chat GPT, do… | अँड्रॉईडधारकांसाठी गुड न्यूज! चॅट जीपीटीसाठी प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात, असे करा...

अँड्रॉईडधारकांसाठी गुड न्यूज! चॅट जीपीटीसाठी प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात, असे करा...

googlenewsNext

अ‍ॅपल युजर्स गेल्या काही महिन्यांपासून चॅटजीपीटी वापरत आहेत. परंतू, अद्याप अँड्रॉईड युजर्स त्याची वाट पाहत होते. आता अँड्रॉईडधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. चॅट जीपीटीसाठी प्री रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. 

ChatGPT डेव्हलपर्स ओपन एआयने या बाबत एक ट्विट केले आहे. चॅट जीपीटी नुकतेच गुगल प्ले स्टोअरवर अपलोड करण्यात आले आहे. मात्र, युजर्सना अ‍ॅप डाऊनलोड करता येत नव्हते. आता ते डाऊनलोड करता येत आहे. या अ‍ॅपवर प्री रजिस्टर करता येणार आहे. यामुळे लाँच झाल्यावर अलर्ट दिला जाणार आहे. 

ChatGPT च्या Android आवृत्तीवर खूप कमी तपशील उपलब्ध आहे. भविष्यात आयफोनप्रमाणे इतर माहिती उपलब्ध केली जाऊ शकते. अॅपचा स्क्रीनशॉटनुसार ते iOS व्हर्जनसारखेच असेल. iOS अ‍ॅप मोफत वापरता येत आहे. यामुळे अँड्रॉईडवर देखील ते मोफत मिळणार आहे. Android डिव्हाइसेसवर ChatGPT वर व्हॉईस इनपुट असेल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

कसे कराल इन्स्टॉल...
Google Play Store वर OpenAI आधारित ChatGPT टाइप करा. जिथे तुम्हाला Coming Soon चा पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्हाला Install या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथे रजिस्टर केल्यावर ChatGPT लाँच होईल, तेव्हा तुम्हाला आधी सूचना मिळतील.

Web Title: Good news for Android users! To start pre-registration for Chat GPT, do…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.