आयफोन युजर्ससाठी गुडन्यूज! iOS 17 रोलआऊट होणार, फक्त वाट पहावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 11:15 AM2023-06-06T11:15:00+5:302023-06-06T11:15:39+5:30

येत्या काही दिवसांत आयफोनधारकांना नवीन फिचर्स मिळणार आहेत. 

Good news for iPhone users! iOS 17 will roll out in WWDC 2023 event, also mac airbook and mac studio launched | आयफोन युजर्ससाठी गुडन्यूज! iOS 17 रोलआऊट होणार, फक्त वाट पहावी लागणार

आयफोन युजर्ससाठी गुडन्यूज! iOS 17 रोलआऊट होणार, फक्त वाट पहावी लागणार

googlenewsNext

अ‍ॅपलकडून आयफोन ग्राहकांसाठी मोठी भेट देण्यात आली आहे. कंपनीने iOS 17 सॉफ्टवेयर रोलआऊट केले आहे. याची घोषणाच WWDC 2023 इव्हेंटमध्ये करण्यात आली आहे. याचबरोबर अ‍ॅपलने 15 इंचाचे मॅकबुक एअर आणि नवीन मॅक स्टुडिओ लाँच करण्य़ात आला आहे. येत्या काही दिवसांत आयफोनधारकांना नवीन फिचर्स मिळणार आहेत. 

आयओएस १७ मध्ये युजर्सना व्हॉईसमेलचे रिअल टाईम ट्रान्सलेशन फीचर मिळणार आहे. म्हणजेच कोणत्याही व्हॉईसचे ट्रान्सलेशन करता येणार आहे. जर एखाद्याला कोरियाई आवाजात मेल मिळाला असेल तर तो हिंदीत ऐकता येणार आहे. तसेच त्याचे उत्तरही हिंदीत देता येणार आहे. तसेच इंटरनेट नसले तरी रिअल टाईम मॅपचा वापर करता येणार आहे. 

आयफोन ग्राहकांना यासाठी काही महिने वाट पहावी लागणार आहे. कारण iOS 17 सॉफ्टवेअर अपडेट सप्टेंबरच्या मध्यावर उपलब्ध होणार आहे. तसेच आयफोन १५ सप्टेंबरमध्येच लाँच होणार आहे, त्यात आयओएस १७ असणार आहे. iOS 17 अपडेट iPhone XS, iPhone XS Max, iPhone XR, iPhone 11, iPhone 12 Series, iPhone 13 Series, iPhone 14 सिरीजसाठी उपलब्ध केली जाणार आहे. 

काय आहेत नवीन फिचर...

  • नवीन फेसटाइम फीचर येत आहे. जर एखाद्याने कॉल मिस केला असेल तर, हे फीचर व्हिडिओ संदेश पाठवेल.
  • iMessages द्वारे स्वाइप करून उत्तर देऊ शकणार आहेत. तसेच लोकेशन शेअर करता येणार आहे. 
  • मोशन फोटो वापरून लाइव्ह स्टिकर्स देखील बनविता येणार आहेत. ऑफलाइन मोडमध्येही मॅप वापरता येणार आहे. 
  • AirDrop वापरून नवीन व्यक्तीसोबत फोन नंबर स्वॅप करता येणार आहेत. यासाठी फोन शेजारी शेजारी आणावे लागणार आहेत.

Web Title: Good news for iPhone users! iOS 17 will roll out in WWDC 2023 event, also mac airbook and mac studio launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल