Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 21:40 IST2025-03-13T21:40:18+5:302025-03-13T21:40:46+5:30

या प्लॅन्समध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधताही मिळते.

Good news for Jio users; 20GB free data will be available in these 2 plans, know the details | Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स...

Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स...

20GB Free Data With Jio Plan: तुम्ही Jio युजर असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. रिलायन्सजिओ त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनसह 20GB डेटा मोफत देते. आम्ही तुम्हाला Jio च्या दोन उत्तम प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात 20GB डेटा मोफत उपलब्ध मिळतो आणि तो कोणत्याही अटीशिवाय. 

मोफत डेटासह जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन 749 रुपयांचा आहे. हा प्लॅन 72 दिवसांच्या वैधतेसह येतो. या यादीतील दुसऱ्या प्लॅनची ​​किंमत 899 रुपये असून, हा प्लॅन 90 दिवसांसाठी चालतो. 

जिओच्या 749 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
रिलायन्स जिओ 749 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 GB हायस्पीड डेटा ऑफर करते. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनची ​​वैधता 72 दिवसांची आहे. 72 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये एकूण 144 GB हायस्पीड डेटा मिळतो. या व्यतिरिक्त, तुम्हाला या प्लॅनमध्ये 20 GB फ्री डेटादेखील मिळतो, त्यामुळे तुम्हाला या प्लॅनमध्ये 164 GB डेटाचा लाभ मिळतो.

जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
8999 रुपयांच्या या जिओ प्रीपेड प्लॅनसह रिलायन्स जिओ दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा प्रदान करते. हा प्लान 90 दिवसांच्या वैधतेसह येतो, त्यामुळे हा प्लान एकूण 180 GB हाय स्पीड डेटा देतो. परंतु Jio या प्लानमध्ये 20 GB अतिरिक्त डेटादेखील देत आहे, त्यामुळे 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 200 GB डेटाचा लाभ मिळेल.

Web Title: Good news for Jio users; 20GB free data will be available in these 2 plans, know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.