विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळेची तयारी करा अॅमेझॉनवर; लॅपटॉप्सवर 40% पर्यंत सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 03:55 PM2022-06-06T15:55:29+5:302022-06-06T15:56:07+5:30
‘बॅक टू स्कूल’ सेलमध्ये लॅपटॉपवर 30 टाक्यांपर्यंतची शानदार सूट मिळत आहे.
अॅमेझॉन इंडियानं ‘बॅक टू स्कूल’ स्टोरची घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या स्टोअरमध्ये शालोपयोगी वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट दिला आजच्या आहे. यात इलेक्ट्रॉनिक्सचा देखील समावेश आहे. एचपी, असुस, ऑनर, शाओमी आणि डेल या ब्रँड्सचे डिवाइस स्वस्तात मिळत आहेत. तसेच अभ्यास आणि लेखन आवश्यक गोष्टी, स्टेशनरी, लॅपटॉप, टॅब्लेट आणि पीसी, हेडसेट आणि स्पीकर, प्रिंटरवर 40% पर्यंत सूट देण्यात आली आहे. ‘बॅक टू स्कूल’ स्टोर 12 जून 2022 पर्यंत अॅमेझॉनवर लाईव्ह करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातून मागणी जास्त
Amazon.in नं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून इतर राज्यांच्या तुलनेत लॅपटॉप्सना सर्वाधिक जास्त मागणी आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई मधून लॅपटॉपसाठी मागणी वाढली आहे. तर तसेच कल्याण, औरंगाबाद, लातूर, सातारा, भुसावळ आणि अलिबाग यांसारखे लहान शहरांमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली आहे. Amazon.in वर लॅपटॉपचा सर्च देखील दुप्पट झाला आहे.
या लॅपटॉप्सची मागणी जास्त
ऑनर, रेडमी, एचपी आणि लेनोवो यांसारख्या ब्रँड्सच्या एंट्री लेव्हल लॅपटॉपसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे. महत्वाचे म्हणजे, एंट्री लेव्हल स्मार्टवॉचसह रॅम, एचडीडी आणि प्रिंटर इंक यांसारख्या पीसी कंपोनंट्सची मागणी देखील वाढली आहे. गेमींग सातत्त्याने वाढत आहे, ग्राहक त्यासाठी एचपी आणि असुस हे ब्रँड्स बघत आहेत. लॉजीटेक, हायपरएक्स आणि एचपी यांसारख्या ब्रँड्सचे माऊस प्रीमियम गेमिंग हेडसेट यांची मागणी देखील वाढत आहे.