Vi ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! व्होडाफोनची 5G सेवा सुरु, कंपनीने म्हटलेय तयार रहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 03:24 PM2023-11-15T15:24:00+5:302023-11-15T15:24:11+5:30
एकेकाळी सर्व्हिसमध्ये टॉपची कंपनी असणाऱ्या व्होडाफोनने सव्वा वर्ष लेट का होईना भारतात निवडक सर्कलमध्ये फाईव्ह जी सेवा सुरु केली ...
एकेकाळी सर्व्हिसमध्ये टॉपची कंपनी असणाऱ्या व्होडाफोनने सव्वा वर्ष लेट का होईना भारतात निवडक सर्कलमध्ये फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे. व्होडाफोन आयडियाच्या अधिकृत वेबसाईटनुसार व्हीआयची ५जी सेवा पुणे आणि दिल्लीमध्ये सुरु केली जाणार आहे.
Vi ने आपल्या 5G सेवेबद्दल वेबसाईटवर काही डिटेल्स जारी केले आहेत. दिल्ली आणि पुण्याच्या ग्राहकांना कंपनीच्य़ा फाईव्ह जी सेवेसाठी तयार रहायला हवेय, असे म्हटले आहे. Vi 5G सेवा वापरण्यासाठी, 5G-रेडी सिम आवश्यक असणार आहे. 2022 मध्ये एका प्रेस रिलीझद्वारे, कंपनीने सांगितले होते की 4G, 3G किंवा जुन्या सेवांच्या तुलनेत 5G सेवा जलद डाउनलोड गती आणि चांगला प्रतिसाद देणारी असेल.
4G सिम कार्ड बदलण्याची गरज भासणार नाही. आधीच्याच फोरजी सिमवर नेटवर्क काम करेल. युजरकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे, असे कंपनीने गेल्या वर्षी म्हटले होते.
काय कराल...
सर्वप्रथम तुम्हाला फोन सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे Vi सिम निवडावे लागेल. जर तुमच्या क्षेत्रात 5G असेल तर तुम्हाला Preferred नेटवर्क प्रकार 5G वर बदलावा लागेल. तुम्ही 5G नेटवर्क वापरण्यासाठी फोन रीस्टार्ट करू शकता. Jio आणि Airtel सध्या अमर्यादित 5G सेवा देत आहेत. मात्र, Vi ने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.