खुशखबर...लवकरच कॉल दर होणार स्वस्त !

By शेखर पाटील | Published: August 14, 2017 02:00 PM2017-08-14T14:00:00+5:302017-08-14T14:00:00+5:30

भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण अर्थात ट्रायच्या एका निर्णयामुळे लवकरच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

Good news ... soon call rates are cheap! | खुशखबर...लवकरच कॉल दर होणार स्वस्त !

खुशखबर...लवकरच कॉल दर होणार स्वस्त !

Next

भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण अर्थात ट्रायच्या एका निर्णयामुळे लवकरच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.
भारतीय सेल्युलर सेवा पुरवणार्‍या कंपन्यांवर नियंत्रणाचे काम ट्राय करत असते. येत्या काही दिवसातच ट्रायतर्फे एका महत्वाच्या मुद्याबाबत घोषणा होण्याची शक्यता असून यामुळे कॉल दरांमध्ये घट होणार असून साहजीकच मोबाईलय युजर्सला लाभ होणार आहे. देशातील कोणत्याही मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीकडे परिपूर्ण पायाभूत सुविधा नाहीत. यामुळे काही सेवांसाठी इतर कंपन्यांवर अवलंबून रहावे लागत असते. यातील सर्वात मोठी सेवा म्हणजे इंटरकनेक्ट युजेस चार्जेस म्हणजे आययूसी होय. ही इंटरकनेक्टीव्हिटी साठीची प्रणाली होय. समजा माझ्याकडे एयरटेल कंपनीचा मोबाईल असून मी आयडिया वा अन्य दुसर्‍या कंपनीच्या युजरशी बोलतोय. यावेळी त्या युजरला इनकमींगचे पैसे लागत नाहीत. मात्र हा कॉल पूर्ण होण्यासाठी एयरटेल कंपनी आयडियाला पैसे देत असते. याच पध्दतीने मोबाईल कंपन्या एकमेकांना कॉल दराची रक्कम अदा करत असतात. 
२००३ साली ट्रायने मोबाईल कंपन्यांसाठी कॉलींग पार्टी-पे म्हणजेच सीपीपी या नावाने प्रणाली लागू केल्यानंतर या पध्दतीची आकारणी उदयास आली. आधी एका मिनिटाला तब्बल १.१० रूपये इतके आकारले जात होते. ही रक्कम कमी होत आता १४ पैशांवर आली आहे. अर्थात कंपन्या एकमेकांना आपल्या युजर्सच्या कॉल साठी या दराने रक्कम अदा करत असतात. मात्र अलीकडच्या काळात फोर-जी व्हाईस ओव्हर नेटवर्क अर्थात व्हिओ-एलटीई सेवेचा उदय झाल्यानंतर १४ पैशांची रक्कम जास्त असल्याचा युक्तीवाद काही कंपन्यांनी केला. विशेष करून रिलायन्स जिओने या संदर्भात ट्रायकडे हे दर कमी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे या प्रणालीच्या माध्यमातून रग्गड कमाई करणार्‍या एयरटेलने दर वाढविण्याची मागणी केली. मात्र ट्रायने ग्राहकांना दिलासा देत जिओच्या मागणीवर सकारत्मक भूमिका घेतली आहे. यामुळे १४ पैशांचा कॉल दर आता कमी होण्याची शक्यता आहे. यात किती घट करण्यात येईल? याची माहिती देण्यात आली नसली तरी याचा थेट लाभ ग्राहकांना होणार आहे. याबाबत ट्राय लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थातच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये घट होणार आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने सविस्तर आणि सर्वात पहिल्यांदा वृत्त दिले असून ट्रायच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.

Web Title: Good news ... soon call rates are cheap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.