खूशखबर... १५ मेनंतरही व्हॉट्सॲप सुरूच राहणार, प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 01:50 AM2021-05-09T01:50:48+5:302021-05-09T06:53:33+5:30

व्हॉट्सॲपचे यूझर्स जो कंटेंट व्हॉट्सॲपवर अपलोड करतात, सबमिट करतात, सेंड वा रिसीव्ह करतात त्या सगळ्याचा वापर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी फेसबुक करू शकणार आहे.

Good news ... WhatsApp will continue after 15 minutes, withdraws from privacy policy deadline | खूशखबर... १५ मेनंतरही व्हॉट्सॲप सुरूच राहणार, प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार

खूशखबर... १५ मेनंतरही व्हॉट्सॲप सुरूच राहणार, प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार

googlenewsNext

आपल्या तमाम यूझर्सना व्हॉट्सॲपने खूशखबर दिली आहे. आपल्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सॲपने १५ मे ही अंतिम मुदत ठरवून दिली होती; मात्र चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यावर आता व्हॉट्सॲपने या मुदतीपासून माघार घेतली आहे. यूझर्सने नव्या पॉलिसीचा स्वीकार नाही केला तरी त्यांचे अकाउंट सुरूच राहणार आहे... (Good news ... WhatsApp will continue after 15 minutes, withdraws from privacy policy deadline)

पॉलिसीचा स्वीकार न केल्यास
- प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार न केल्यास कालांतराने यूझरचे व्हॉट्सॲप अकाउंट आपोआप निष्क्रिय होणार आहे.
- प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी ८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र त्यानंतर ही मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली. व्हॉट्सॲपने ही अंतिम मुदत मागे घेतली आहे.

काय आहे प्रायव्हसी पॉलिसी
व्हॉट्सॲपचे यूझर्स जो कंटेंट व्हॉट्सॲपवर अपलोड करतात, सबमिट करतात, सेंड वा रिसीव्ह करतात त्या सगळ्याचा वापर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी फेसबुक करू शकणार आहे.
यूझर आयडी, डिव्हाइस आयडी, शॉपिंग हिस्ट्री, फोन नंबर, ई-मेल पत्ता, पेमेंट इन्फो, प्रॉडक्ट इंटरॅक्शन, यूझर कंटेंट इत्यादी माहिती व्हॉट्सॲपकडे शेअर होणार आहे. त्यामुळे यूझर्सच्या प्रायव्हसीवर गदा येणार आहे.
या सर्व कारणांमुळे व्हॉट्सॲपच्या या प्रायव्हसी पॉलिसीला प्रखर विरोध होत आहे.

मग काय होणार! व्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार घेतली असली तरी यूझरला पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठीचा मेसेज वारंवार येत राहील.
- पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी यूझरला आग्रह धरला जाईल.
- जे यूझर पॉलिसीचा स्वीकार करणार नाही, त्यांचे अकाउंट डिलीट होईल, असे आधी सांगितले गेले होते; परंतु तसे आता होणार नाही.

Web Title: Good news ... WhatsApp will continue after 15 minutes, withdraws from privacy policy deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.