गुगलचा धमाका! केवळ 500 रुपयांत लाँच केला 4जी फोन; जिओला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 10:00 AM2018-12-06T10:00:21+5:302018-12-06T10:00:56+5:30

महत्वाचे म्हणजे हा फोन JioPhone सारखाच दिसतो. या फोनमध्ये गुगलने गुगल असिस्टंटही दिले आहे.

Google 4G phones launched at Rs 500 only; competition with Jiophone | गुगलचा धमाका! केवळ 500 रुपयांत लाँच केला 4जी फोन; जिओला टक्कर

गुगलचा धमाका! केवळ 500 रुपयांत लाँच केला 4जी फोन; जिओला टक्कर

Next

मुंबई : जगभरात नावाजलेली कंपनी गुगलने भारतात 4जी सेवेचा विस्तार पाहता केवळ 500 रुपयांत फिचर फोन लाँच करत सर्वांनाच धक्का दिला आहे. WizPhone WP006 असे या फोनचे नाव असून हा फिचर फोन JioPhone ला कडवी टक्कर देणार आहे. महत्वाचे म्हणजे हा फोन JioPhone सारखाच दिसतो. या फोनमध्ये गुगलने गुगल असिस्टंटही दिले आहे. 


या फोनमधील फिचरवर नजर फिरविल्यास यामध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याशिवाय या फोनमध्ये 4 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 512 एमबीची रॅम देण्यात आली आहे. हा फोन JioPhone सारखाच KaiOS वर चालतो. या फोनमध्ये 1800 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. पाठीमागे 2 मेगापिक्सलचा कॅमेरा तर पुढे VGA कॅमेरा देण्यात आला आहे. सध्या हा फोन इंडोनेशियामध्ये उपलब्ध असून त्याची किंमत IDR 99,000 (490 रुपये) एवढी आहे. हा फोन भारतातही लवकरच लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

 
WizPhone WP006 हा फोन सिंगल सिमला सपोर्ट करतो.  SPRD 9820A/QC8905 हा ड्युअल कोअर प्रोसेसर देण्य़ात आला आहे. ग्राफिक्ससाठी माली-400 जीपीयू देण्यात आला आहे. मेमरी 128 जीबी पर्यंत वाढविली जाऊ शकते. 
 

Web Title: Google 4G phones launched at Rs 500 only; competition with Jiophone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.