खूशखबर! मोबाईल डेटाने टीव्ही पाहता येणार; गुगलने आणलं दमदार फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:17 AM2019-09-19T11:17:55+5:302019-09-19T11:38:15+5:30

सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मोबाईल डेटाच्या मदतीने आता युजर्सना लवकरच टीव्ही पाहता येणार आहे

google added new data saver feature in android tv to let users watch tv with mobile dat | खूशखबर! मोबाईल डेटाने टीव्ही पाहता येणार; गुगलने आणलं दमदार फीचर

खूशखबर! मोबाईल डेटाने टीव्ही पाहता येणार; गुगलने आणलं दमदार फीचर

Next
ठळक मुद्देगुगलने भारतात Android TV साठी एक नवीन फीचर रोलआऊट केले आहे. गुगलने एक कास्ट फीचर लॉन्च केलं ज्याच्या मदतीने युजर्स डाऊनलोड केलेल्या मीडिया फाईल्स देखील टीव्हीवर पाहू शकणार आहेत. डेटा सेव्हर, डेटा अलर्ट्स आणि हॉटस्पॉट गाईड असे फीचर्स असणार आहेत.

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मोबाईल डेटाच्या मदतीने आता युजर्सना लवकरच टीव्ही पाहता येणार आहे. गुगलने भारतात Android TV साठी एक नवीन फीचर रोलआऊट केले आहे. वाय-फाय कनेक्शन नसणाऱ्या तसेच मोबाईल डेटा आणि हॉटस्पॉटच्या मदतीने टीव्ही पाहणाऱ्या युजर्ससाठी खास गुगलने हे नवं फीचर आणलं आहे. यासोबतच गुगलने एक कास्ट फीचर लॉन्च केलं आहे ज्याच्या मदतीने युजर्स डाऊनलोड केलेल्या मीडिया फाईल्स देखील टीव्हीवर पाहू शकणार आहेत. 

गुगलच्या वतीने जोरिस वान मेंस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डेटा सेव्हर, डेटा अलर्ट्स आणि हॉटस्पॉट गाईड असे फीचर्स असणार आहेत. लिमिटेड मोबाईल डेटावर स्मार्ट टीव्ही पाहणाऱ्या भारतीय युजर्ससाठी ते लॉन्च करण्यात आले आहेत. पहिलं फीचर डेटा सेव्हरच्या मदतीने वॉच टाईम जवळपास तीन पटीने वाढवला जाऊ शकतो असा दावा गुगलने केला आहे. तसेच मोबाईल कनेक्शनवर कमी डेटाचा वापर केला जाईल. किती डेटा आतापर्यंत वापरला गेला तर किती शिल्लक आहे याची माहिती ही डेटा अलर्ट्स युजर्सना देणार आहे. हॉटस्पॉट गाईड युजर्सना मोबाईल हॉटस्पॉटसोबत टीव्ही सेटअप करण्यासाठी मदत करणार आहे. 

गुगलच्या पोस्टमध्ये 'भारतात अँड्रॉईड टीव्ही डिव्हाईससाठी लवकच काही नवे फीचर्स रोलआऊट करण्यात येतील. सर्वप्रथम शाओमीच्या स्मार्ट टिव्हीला हे लेटेस्ट अपडेट मिळेल. त्यानंतर TCL आणि MarQ by Flipkart ला याचं ग्लोबल रोलआउट मिळणार आहे. याशिवाय गुगल फाईल्स अ‍ॅपमध्ये कास्ट फीचर बीटा प्रोग्राम हे मिळणार आहे. येत्या काही दिवसांत हे फीचर्स सर्वच युजर्ससाठी रोलआऊट करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सुट्टीवर जाताय...! गुगल तुम्हाला मेल पाठविणाऱ्यांना देणार अलर्ट; नवे फिचर लवकरच

अवघ्या जगाला छोट्याशा स्मार्टफोनवर एकत्र आणणारी कंपनी गुगलने नेहमीच युजरना फायद्याची फीचर आणली आहेत. आता एखादी व्यक्ती सुट्टीवर जात असल्यास त्याला त्याची सुट्टी विना टेन्शन उपभोगू देण्यासाठी गुगल एक चांगले फीचर आणणार आहे. नव्या फीचरमुळे जर कोणी सुट्टीवर जाणार असेल तर त्याला मेल पाठविणाऱ्या व्यक्तींना तो सुट्टीवर असल्याचे अलर्ट पाठविण्यात येणार आहे. हा अलर्ट नोटिफिकेशनद्वारे पाठविला जाणार आहे.  हे फिचर सध्या जी सूट म्हणजेच गुगल एन्टरप्राईज कस्टमर्ससाठी देण्यात येणार आहे. यानंतर काही काळात सामान्य जीमेल वापरणाऱ्यांनाही ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे. 

 

Web Title: google added new data saver feature in android tv to let users watch tv with mobile dat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.