Google-Airtel Partnership: रिलायन्स जिओला टक्कर मिळणार; गुगलकडून एयरटेलमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 03:23 PM2022-01-28T15:23:14+5:302022-01-28T16:56:17+5:30
Google-Airtel Partnership: गुगल फॉर इंडिया डिजिटाइजेशन फंडमधून गुगल 1 बिलियन डॉलरची (सुमारे 7500 कोटी रुपये) गुंतवणूक एयरटेलमध्ये करणार आहे.
Google-Airtel Partnership: Bharti Airtel नं टेक जायंट Google सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. गुगल फॉर इंडिया डिजिटाइजेशन फंडमधून गुगल 1 बिलियन डॉलरची (सुमारे 7500 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. सुरुवातीला 700 मिलियन डॉलर्स गुंतवणूक करून एयरटेलमधील 1.28 टक्के भागीदारी मिळणार आहे. उर्वरित 300 मिलियन डॉलर्स मल्टी ईयर डील अंतगर्त गुंतवण्यात येतील.
Google-Airtel Deal
गुगलच्या भागीदारीमुळे स्मार्टफोनचा प्रसार करणे सोप्पे होईल तसेच 5जी नेटवर्कचा विस्तार देखील करता येईल, असं एयरटेलनं सांगितलं आहे. गूगगल भारतात क्लाउड इकोसिस्टम देखील मजबूत करणार आहे. या गुंतवणुकीतील 300 मिलियनचा वापर एयरटेलचा प्रसार करण्यासाठी केला जाईल. टेक आणि टेलिकॉम कंपनी एकत्र आल्यामुळे देशातील इंटरनेट प्रसार देखील मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो.
गुगलचं पुण्यात नवं ऑफीस
भारतामध्ये गुगल क्लाऊड इंजिनियरिंगचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल भंसाली यांनी सांगितले की, एक आयटी हब म्हणून पुण्यामध्ये आमचा विस्तार आम्हाला उत्तम प्रतिभावंतांसोबत काम करण्याची संधी देईल. वाढत्या ग्राहकांसाठी अद्ययावत क्लाऊड कम्प्युटिंग समाधान, उत्पादन आणि सेवा देण्यासाठीच गुगलकडून हे ऑफिस सुरू केलं जात आहे. गुगल क्लाऊडच्या जागतिक इंजिनियरिंग टीमच्या मदतीने पुण्याचे ऑफिस अद्ययावत इंटरप्राइज क्लाऊडच्या जागतिक इंजिनियरिंग टीमच्या मदतीने पुण्यातील ऑफिस अद्ययावत एंटरप्राइज क्लाऊड तंत्राची निर्मिती, रियल टाइम तांत्रिक सल्ला आणि उत्पादन आणि कार्यान्वयन तज्ज्ञता प्रदान करेल.
हे देखील वाचा:
Flipkart Sale: अर्ध्या किंमतीत 50-इंचाचा दमदार 4K Smart TV; ऑफरचे फक्त काही दिवस शिल्लक