गुगल 'एलो' मेसेजिंग' अॅपची सेवा बंद

By अनिल भापकर | Published: March 18, 2019 01:38 PM2019-03-18T13:38:08+5:302019-03-18T13:45:12+5:30

गुगलने त्यांचे मे २०१६ मध्ये मोठा गाजावाजा करीत लाँच केलेले गुगल 'एलो' ह्या मेसेंजिंग अॅपची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Google 'Allo' Messaging 'service is closed | गुगल 'एलो' मेसेजिंग' अॅपची सेवा बंद

गुगल 'एलो' मेसेजिंग' अॅपची सेवा बंद

googlenewsNext
ठळक मुद्देदिवसेंदिवस व्हॉट्सअॅप आणि तत्सम मेसेंजर अॅपचा वापर वाढतच जाणार आहे.असे असून देखील गुगलने त्यांचे मे २०१६ मध्ये मोठा गाजावाजा करीत लाँच केलेले गुगल 'एलो' ह्या मेसेंजिंग अॅपची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'एलो' हे एक इन्स्टंट मेसेंजिंग अॅप होते ज्यामध्ये गुगलने आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्सचा वापर केल्याचा दावा केला होता . आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्स म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असल्यास हे अॅप तुम्हाला तो मेसेज वाचून शब्द सुचवत होते.गुगलने आपल्या 'एलो' अॅपच्या युझर्सला १५ एप्रिल २०१९ पर्यंत आपले चॅट्स एक्स्पोर्ट करण्याची मुदत दिली आहे.यासोबतच अॅपच्या साईटवर आपल्या चॅट्स चा बॅकअप कसा घ्यावा हे देखील सांगितला आहे.

अनिल भापकर

सध्या मेसेजिंग अॅप ची प्रचंड क्रेझ आहे. जणू काही हे मेसेजिंग अॅप म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांपैकीच एक गरज झाले आहेत. त्यामध्ये व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे.दिवसेंदिवस व्हॉट्सअॅप आणि तत्सम मेसेंजर अॅपचा वापर वाढतच जाणार आहे.असे असून देखील गुगलने त्यांचे मे २०१६ मध्ये मोठा गाजावाजा करीत लाँच केलेले गुगल 'एलो' ह्या मेसेंजिंग अॅपची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय होते गुगल 'एलो'?

गुगलने एलो नावाचे स्मार्ट मेसेजिग अॅप मे २०१६ मध्ये लाँच केले होते. 'एलो' हे एक इन्स्टंट मेसेंजिंग अॅप होते ज्यामध्ये गुगलने आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्सचा वापर केल्याचा दावा केला होता . आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्स म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असल्यास हे अॅप तुम्हाला तो मेसेज वाचून शब्द सुचवत होते. तुम्ही फ़क़्त योग्य शब्द सिलेक्ट केला कि झाला. त्यामुळे तुमचे टायपिंग चे श्रम वाचत होते . गुगल 'एलो' अॅप मध्ये जेव्हा तुम्ही एखादा फोटो पाठवत होता तेव्हा त्याला एडिट करून टेक्स्ट टाकण्याची सुविधा सुद्धा यामध्ये होती. याशिवाय स्टिकर पाठविण्याची सुविधा सुद्धा यामध्ये होती . एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चॅटिंग सुद्धा यामध्ये होत होती. येवढ्या सुविधा असून सुद्धा गुगलने 'एलो' ह्या अॅप ची  सेवा बंद केल्यामुळे टेक्नोसॅव्ही जगतात चर्चा सुरु आहे.

गुगल 'एलो' वापरणाऱ्या युझर्सचे काय होईल ?

गुगलने आपल्या 'एलो' अॅपच्या युझर्सला १५ एप्रिल २०१९ पर्यंत आपले चॅट्स एक्स्पोर्ट करण्याची मुदत दिली आहे.यासोबतच अॅपच्या साईटवर आपल्या चॅट्स चा बॅकअप कसा घ्यावा हे देखील सांगितला आहे. तेव्हा जर तुम्ही  गुगल एलो वापरत असाल तर तुम्ही लगेच तुमच्या चॅट्स चा बॅकअप घ्यायला हवा. तुमचे फोटो आणि व्हिडीओ तुमच्या स्मार्टफोनच्या गुगल फोटोज च्या गुगल एलो फोल्डर मध्ये दिसतील.मात्र याची खात्री करून घ्या आणि जर नसेल तर तुम्ही त्याचा बॅकअप घेऊ शकता. किंवा यामध्ये असलेल्या बॅकअप अँड सिंक चा वापर करून तुमचा डेटा सुरक्षित करता येईल. 

anil.bhapkar@lokmat.com

Web Title: Google 'Allo' Messaging 'service is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.