गुगल असिस्टंस मराठीतूनही...ट्रेनच्या लोकेशनसह वाचा काय मिळणार भविष्यात....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 05:33 PM2018-08-28T17:33:09+5:302018-08-28T17:34:28+5:30
गल फॉर इंडियाच्या चौथ्या भागाचे आज अनावरण करण्यात आले. गुगल सर्च, मॅपसह पेमेंट सिस्टिमचीही सेवा पुरविणार आहे.
नवी दिल्ली : गुगल फॉर इंडियाच्या चौथ्या भागाचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी गुगल इंडियाने भारतात भविष्यातील योजनांची घोषणा केली. यामध्ये गुगल सर्च, मॅपसह पेमेंट सिस्टिमचीही सेवा पुरविणार आहे. गुगलचे वरिष्ठ अभियांत्रिकी संचालक प्रवीर गुप्ता यांनी गूगल असिस्टंस आता मराठी भाषेलाही सपोर्ट करणार असल्याचे सांगितले.
Google जरी सर्वात मोठे आणि प्रसिद्ध सर्चइंजिन असले तरीही या कंपनीला अनेक बाबतीत यश मिळालेले नाही. मेसेंजरसारख्या सुविधा न चालल्याने त्या बंद कराव्या लागल्या होत्या. आता गुगल आणखी काही ग्राहकांभिमुख सेवा आणत आहे. Google असिस्टंस लवकरच अन्य 7 स्थानिक भाषांमध्ये येणार आहे. एवढेच नाही तर Google असिस्टंसवर ट्रेनचे लोकेशनही समजणार आहे. तसेच गुगलने तेज अॅपचे नाव बदलून गुगल पे ठेवले आहे. या अॅपची डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या 5 कोटींवर गेल्याचा दावा गुगलने नुकताच केला होता. या कार्यक्रमानंतर गुगल मॅप आणि असिस्टंसमध्ये काही नवे फिचर वाढण्याची शक्यता आहे.
When the web speaks their language, it becomes a friendlier place for new users. #GoogleForIndiapic.twitter.com/dtSnSrmyzH
— Google India (@GoogleIndia) August 28, 2018
गुगलचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष राजन आनंद यांनी सांगितले की, भारतात यावेळी 40 कोटी इंटरनेट वापरणारे आहेत. यामध्ये 45 टक्के महिला आहेत. यामुळे गुगलला मोठी संधी आहे. भारतात व्हाईस सर्चकरणाऱ्यांमध्ये 270 पटींनी वाढ झाली आहे. पुढील दोन वर्षांत आणखी 10 कोटी इंटरनेट वापरणारे वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. यामुळे अन्य भारतीय भाषांमधून सुविधा देण्यात येणार आहे.
Your simple, secure payments experience remains just the same. Everything you love about Tez is now moving to #GooglePay. #GoogleForIndiapic.twitter.com/RQCmOQqGjw
— Google Pay India (@GooglePayIndia) August 28, 2018
सर्च करणारे 50 टक्क्यांनी वाढले
भारतात कोणतीही गोष्ट शोधायची म्हटली की गुगलवर सर्च केले जाते. गेल्या 12 महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी 50 टक्के जादा युजर्स काही ना काही शोधत असतात.
'नवलेखा' ची सुरुवात
गुगलने या कार्यक्रमामध्ये ''प्रोजेक्ट नवलेखा''ची सुरुवात केली आहे. या अंतर्गत आता प्रकाशक त्यांच्याकडील माहिती ऑनलाईन टाकू शकणार आहेत .या व्दारे देशातील 1.35 लाख प्रकाशकांना डिजिटाईज्ड केले जाणार आहे.
Our partners are joining us on the Android Go mission, to help improve the smartphone experience for everyone. #GoogleForIndiapic.twitter.com/WBuBEc5Ray
— Google India (@GoogleIndia) August 28, 2018
'अँड्रॉईड गो' येणार
गुगलच्या अँड्रॉइड गो या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे यंदा 400हून जास्त फोन लाँच होणार आहेत. सॅमसंग कंपनीचा J2 कोअर हा पहिला फोन असणार आहे.