गुगलच्या 'या' लोकप्रिय सर्व्हिसमध्ये आला 'बग', वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 04:05 PM2019-10-17T16:05:33+5:302019-10-17T16:15:25+5:30

स्मार्टफोनमध्ये विविध बग्स येत असतात.  युजर्सना बग्सचा सामना करावा लागतो.

google assistant bug reportedly damaging smartphones battery and screen | गुगलच्या 'या' लोकप्रिय सर्व्हिसमध्ये आला 'बग', वेळीच व्हा सावध

गुगलच्या 'या' लोकप्रिय सर्व्हिसमध्ये आला 'बग', वेळीच व्हा सावध

Next
ठळक मुद्देजगभरातील अनेक अँड्रॉईड युजर्सनी गुगल असिस्टंटमधील बगबाबत तक्रार केली आहे. गुगल असिस्टंट ऑन करण्यासाठी युजर्सनी 'Hey Google' असं म्हटल्यावर स्क्रीन लगेचच फ्रीझ होते असं युजर्सनी म्हटलं आहे.गुगल असिस्टंटमध्ये आलेला हा बग फोन कायम ऑन ठेवण्याचे काम करतो.

नवी दिल्ली - स्मार्टफोनमध्ये विविध बग्स येत असतात. युजर्सना बग्सचा सामना करावा लागतो. Google प्रोडक्ट्समध्ये मलीशस अ‍ॅप्स आणि बग्स येत असतात. आता गुगल असिस्टंटमध्ये एक बग आल्याची माहिती मिळत आहे. जगभरातील अनेक अँड्रॉईड युजर्सनी गुगल असिस्टंटमधील बगबाबत तक्रार केली आहे. 

गुगल असिस्टंट ऑन करण्यासाठी युजर्सनी 'Hey Google' असं म्हटल्यावर स्क्रीन लगेचच फ्रीझ होते असं युजर्सनी म्हटलं आहे. तसेच हा बग स्क्रीन फ्रीझ करून स्क्रीन कायम ऑन ठेवण्याचे काम करतो. यामुळे फोनची बॅटरी लवकर कमी कमी होत जाते. यामुळे मोबाईलचा डिस्प्ले देखील कायमचाच निकामी होण्याचा धोका असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. तसेच स्क्रीन फ्रीझ होत असल्याने युजर्सला कोणतेही अ‍ॅप किंवा फंक्शन वापरता येत नाही. गुगल असिस्टंटशी जोडल्या गेलेल्या स्मार्ट डिव्हायसेसवर जे लोक काम करतात अशा युजर्सना या बगमुळे जास्त त्रास होत आहे. 

अँड्रॉईड पोलीस या प्रसिद्ध वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डिव्हाईसला ही या समस्येचा सामना करावा लागला आहे. स्मार्ट डिव्हायसेसशी जोडल्या गेलेल्या स्मार्टफोन युजर्सना या समस्येचा अधिक फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फोनच्या बॅटरीला यामुळे धोका निर्माण झाला आहे. गुगल असिस्टंटमध्ये आलेला हा बग फोन कायम ऑन ठेवण्याचे काम करतो. यामुळे फोन लॉक देखील होत नाही. गुगल म्हटल्याने स्क्रीन फ्रीझ होत असल्याने युजर्सला कोणतेही अ‍ॅप किंवा फंक्शन वापरता येत नसल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सप्टेंबर महिन्यात गुगलला याबाबत माहिती मिळाली असल्याचं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. गुगलच्या सपोर्ट फोरमवर काही युजर्सनी याबाबतची तक्रार देखील नोंदवली होती. आता हा बग सर्वात जास्त गुगल पिक्सल स्मार्टफोन्स आणि गुगल होम डिव्हायसेसवर सर्वाधिक हल्ला करत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा बग नेमका येतो कुठून याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही. तसेच गुगलने देखील बगबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. 
 

Web Title: google assistant bug reportedly damaging smartphones battery and screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.