Google ने आणले अनोखे फीचर; आता कोणत्याही भाषेत पाहता येणार Youtube व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 10:01 PM2024-12-11T22:01:58+5:302024-12-11T22:08:36+5:30
Google Auto Dubbing Feature: YouTube च्या नवीन फीचरच्या मदतीने व्हिडिओ बघणे आणि समजणे सोपे होईल.
Youtube Auto Dubbing Feature: टेक जायंट Google ने आपल्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वर एक नवीन फिचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही YouTube व्हिडिओचा आवाज बदलू शकता. 'ऑटो डबिंग', असे या फीचरचे नाव असून, ते AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) च्या मदतीने काम करते. यूट्यूबच्या नवीन फीचरच्या मदतीने जगातील अनेक भाषांमध्ये व्हिडिओ सहज पाहता येणार आहेत.
या फीचरचा काय फायदा होईल?
या फीचरच्या मदतीने यूट्यूब आपोआप व्हिडिओ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रांसलेट आणि डब करेल. याचा अर्थ असा की, जर तुम्ही इंग्रजीमध्ये व्हिडिओ अपलोड केला असेल, तर तो फ्रेंच, जर्मन, हिंदी, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषांमध्ये डब केला जाईल.
हे फीचर कसे काम करेल?
YouTube व्हिडिओ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रांसलेट करणे ही एक प्रकारची जादू आहे, जी Ai च्या मदतीने केली जाईल. हे फीचर युजरसाठी आणि विशेषतः कंटेट क्रिएटर्ससाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते. हे तंत्रज्ञान अद्याप नवीन आहे, त्यामुळे कधीकधी भाषांतरात काही चुका होऊ शकतात. पण हे तंत्रज्ञान कालांतराने सुधारले जाईल.
कसे वापरावे?
हे फीचर अद्याप प्रत्येकासाठी उपलब्ध नाही. मात्र, कंपनीने याची सुरुवात केली आहे. सध्या हे फीचर काही निवडक चॅनेल्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर तुमच्या चॅनेलसाठी उपलब्ध असल्यास, तुम्ही ते "अॅडव्हान्स सेटिंग्ज" मध्ये पाहू शकता. तुम्ही डब केलेला व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी रिव्हूदेखील करू शकता.