सावधान! तुमच्या Smart TV वरील ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आत्ताच डिलीट करा; Google केलेत बॅन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 01:27 PM2021-11-15T13:27:08+5:302021-11-15T13:27:45+5:30

Joker Malware In Smart TV Apps: Kaspersky चे सिक्यॉरिटी अनॅलिस्ट शिश्कोवा यांनी या दोन्ही अ‍ॅप्सची माहिती दिली आहे. हे दोन्ही अ‍ॅप्स जोकर मालवेयरयुक्त आहेत.

Google bans 2 smart tv apps with joker malware from play store check phone now  | सावधान! तुमच्या Smart TV वरील ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आत्ताच डिलीट करा; Google केलेत बॅन 

सावधान! तुमच्या Smart TV वरील ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप्स आत्ताच डिलीट करा; Google केलेत बॅन 

Next

गुगलने प्ले स्टोरवरून दोन धोकादायक अ‍ॅप्स बॅन केले आहेत. यातील एक अ‍ॅप प्ले स्टोरवर खूप लोकप्रिय आहे. बॅन केलेल्या दोन्ही अ‍ॅप्समध्ये जोकर मालवेयर आहे. हा तोच मालवेयर आहे जो गेले कित्येक दिवस अँड्रॉइड स्मार्टफोन अ‍ॅप्समध्ये आढळत आहे. गुगलने Smart TV remote आणि Halloween Coloring हे दोन अ‍ॅप्स डिलीट केले आहेत.  

Kaspersky चे सिक्यॉरिटी अनॅलिस्ट शिश्कोवा यांनी या दोन्ही अ‍ॅप्सची माहिती दिली आहे. हे दोन्ही अ‍ॅप्स जोकर मालवेयरयुक्त आहेत. जो एक धोकादायक मालवेयर आहे. हा मालवेयर युजर्सच्या न कळत त्यांना प्रीमियम सर्व्हिसेसना सब्सक्राइब करतो.  

Kaspersky च्या रिपोर्टनुसार, स्मार्ट टीव्ही रिमोट अ‍ॅपमध्ये resources/assets/kup3x4nowz फाईल आणि हॅलोविन कलरिंग अ‍ॅपमध्ये q7y4prmugi नावाची लपल्याचे तपासातून दिसून आले. या फाईल्स इन्क्रिप्टेड असल्यामुळे अँटीव्हायरसला सापडत नाहीत आणि म्हणून या अ‍ॅप्सचा धोका अधिक वाढतो.  

जर तुमच्या अँड्रॉइड डिवाइसमध्ये ‘स्मार्ट टीव्ही रिमोट’ आणि ‘हॅलोविन कलरिंग’ पैकी कोणताही अ‍ॅप असेल तर तो त्वरित अनइंस्टॉल करून टाका. तसेच या अ‍ॅपद्वारे तुम्ही कोणत्याही पेड सर्व्हिस साइन अप केल्या आहेत कि नाही ते देखील तपासा.  

Web Title: Google bans 2 smart tv apps with joker malware from play store check phone now 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.