Google करणार मोठा बदल; या वर्षाच्या अखेरपर्यंत 15 कोटी युजर्सवर होणार याचा परिणाम
By सिद्धेश जाधव | Published: October 7, 2021 12:38 PM2021-10-07T12:38:31+5:302021-10-07T12:38:39+5:30
Google to enroll 2FA on 150 million accounts: Google ने 150 million युजर्सच्या अकॉउंटची सुरक्षा वाढण्यासाठी टू-फॅक्टर-ऑथेंटिकेशन (2FA) वर एनरॉल करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुगल या वर्षाच्या अखेरपर्यंत 15 कोटीपेक्षा जास्त युजर्सच्या अकॉउंटची सुरक्षा वाढवणार आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून या सर्व अकॉउंट्सवर टू-फॅक्टर-ऑथेंटिकेशन (2FA) डिफॉल्ट करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे हे अकॉउंट पूर्णपणे सुरक्षित होतील. या नव्या सुरक्षेमुळे लॉगिन करण्यासाठी अकॉउंट पासवर्ड टाकल्यावर अजून एक ऑथेंटिकेशन कोड सबमिट करावा लागेल. हा कोड युजरच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यात येईल.
गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमधून या बदलाची माहिती दिली आहे. कंपनीने 2021 च्या अखेरपर्यंत 15 कोटी गुगल युजरच्या अकॉउंट मध्ये टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑटो एनरॉल करणार असल्याचे सांगितले आहे. तसेचज दोन दशलक्ष Youtube क्रिएटर्सना देखील हे फीचर ऑन करावे लागेल. अकॉउंटच्या सुरक्षेसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सर्वात विश्वासू पद्धत असल्याचे गुगलने सांगितले आहे. याची सुरुवात कंपनीने यावर्षी मे मधेच केली आहे.
2FA (Two Factor Authentication) म्हणजे काय?
2FA किंवा 2SV मध्ये अकॉउंटमध्ये लॉगिन करण्यासाठी दोन फॅक्टर्सची गरज असते. यातील पहिला फॅक्टर म्हणजे तुमचा पासवर्ड असतो. तर दुसरा फॅक्टर तुमच्या स्मार्टफोनवर येणारा कोड. यामुळे जरी तुमचा पासवर्ड कोणाच्या हाती लागला तरी तुमच्या अकॉउंटमध्ये लॉगिन करणे जमणार नाही. तुम्ही तुमच्या गुगल अकॉउंट सेटिंगमध्ये जाऊन हे फिचर ऑन करू शकता. गुगलने ब्लॉगमधून 2SV किंवा 2FA च्या नव्या टेक्नॉलॉजीवर काम करत असल्याची देखील माहिती दिली आहे.