गुगल Birthday Surprise Spinner; नेटकऱ्यांसाठी काही खास खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 11:24 AM2017-09-27T11:24:24+5:302017-09-27T12:53:52+5:30
आपल्या 19व्या वाढदिवसानिमित्त गुगल Birthday Surprise Spinner घेऊन आलं आहे
मुंबई- इंटरनेट जगतातील सर्व नेटकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या लाडक्या गुगलचा आज 19 वा वाढदिवस आहे. गुगल सर्च इंजिन हे नेटकऱ्याचं सर्वांत लाडकेृं शोध साधन आहे. आपल्या 19व्या वाढदिवसानिमित्त गुगल Birthday Surprise Spinner घेऊन आलं आहे. याद्वारे नेटकरी आपलं मनोरंजन करू शकतो. या खास गुगल Birthday Surprise Spinner वर नेटकऱ्यांसाठी विविध खेळ तयार करण्यात आले आहेत. त्या खेळाचा नेटकरी आनंद घेऊ शकतात. गुगल पेज सुरू केल्यावर येणाऱ्या विंडोवर क्लिक केलं की नेटकऱ्यांना स्पिनर दिसेल त्या स्पिनरवर क्लिक केल्यावर विविध गेम असतील त्यापैकी एका खेळावर स्पिनर येऊन थांबला की तो खेळ आपण खेळू शकतो. गुगलने गेल्या १९ वर्षांत लाँच केलेले १९ सरप्राइज आहेत. यात गुगलच्या प्रसिद्ध झालेल्या 'स्नेक' गेमचाही समावेश आहे.
गुगल Birthday Surprise Spinner मधील काही गेम
- स्नेक गेम
गुगलच्या सर्च फनबॉक्समधील स्नेम गेम हा लेटेस्ट वैशिष्ट्यं असणारा खेळ आहे. या खेळामध्ये एक साप आहे ज्याची उंची बोर्डवर असणारा प्रत्येक सफरचंद खाल्ला की वाढत जाते. बोर्डवर एका मागे मागे असे सफरचंद येतात. सापाने एक सफरचंद खाल्ला की लगेचच दुसऱ्या ठिकाणी सफरचंद येतं. ते सफरचंद पुन्हा सापाला पडकायचं आहे. पण या बोर्डवर असलेल्या चार बाजूंपैकी एका बाजूला सापाची धडक बसली तर गेम पुन्हा सुरू होतो. गेममधील या सापाची हालचाल युजरला कि-बोर्डवरील अॅरो किवरून कंट्रोल करायची आहे. मोबाईल डिव्हाइसमध्ये सुरू झालेले स्नेक गेम हा पहिला खेळ असल्याचं पॉकेजगेमर.बिज ने म्हंटलं आहे.
- क्रिकेट गेम
ई क्रिकेट गेम गुगलने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताची कामगिरी साजरी करण्यासाठी या वर्षीच्या सुरूवातीला लॉन्च केला आहे. गुगलने तयार केलेल्या सर्वात लोकप्रिय डुडल गेमपैकी हा गेम एक हे सिद्ध झाले आहे. हा गेम सुरू केल्यावर सुरूवातीला क्रिकेट.. क्रिकेट असा आवाज येतो. डुडलवरील हा गेम अत्यंत उत्कृष्टपणे तयार करण्यात आला आहे. यामध्ये समोरून येणारा बॉल मारण्यासाठी वेळेनुसार बॅटवर क्लिक करायचं आहे. योग्य वेळी बॅटवर क्लिक केल्यावर बॅट फिरून बॉलवर मारली जाते. या खेळात तुम्ही सिक्सपण लगावू शकता. तसंच पळून रन्सही बनविता येतील. गेमवर एक स्कोअर बोर्ड आहे. त्यावर तुमचा स्कोअर दिसेल. जर तुमच्याकडून बॉल चुकला तर तुम्ही मॅचमधून आऊट व्हाल.
- हिपहॉप गेम
आजच्या सरप्राइज स्पिनरमध्ये गुगलने नेटकऱ्यांसाठी खास गेम पुन्हा आणला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला गुगलने हिपहॉप म्युझिकचा पंचेचाळीसाव्वा वाढदिवस साजरा केला होता. या खेळात गुगलने नेटकऱ्यांना डिजे बनण्याची संधी दिली होती. म्हणजे डुडलने दिलेल्या म्युझिक बोर्डवर तुम्ही तुम्हाला आवडणारं हिपहॉप म्युझिक वाजवू शकता. हा गेम खेळण्यासाठी बोर्डवर असणाऱ्या प्ले बटणवर क्लिक करायचं आहे. प्ले बटण क्लिक केल्यावर डिजीटर 'रेकॉर्ड क्टे' सुरू होईल, त्यामध्ये क्लासिक म्युझिकची एक लिस्ट असेल. त्या गाण्यांना तुम्ही तुमच्या आवडत्या हिपहॉप म्युझिकमध्ये वाजवू शकता. तुम्ही निवडलेलं गाणं स्लायडर कंट्रोलच्या मदतीने दुसऱ्या म्युझिकमध्ये कस्टमाइज करू शकता.
- ब्रिथिंग एक्सरसाइज
गुगलने नेटकऱ्यांच्या आरोग्यासाठीही काही गोष्टी सुरू केल्या. तुम्हाला तणाव जाणवत असेल तर गुगलवर ब्रिथिंग एक्सरसाइज टाइप केलं की गुगलकडून तणाव दूर करण्यासाठी विविध सोपे पर्याय देण्यात आले आहे. ज्याचा फायदा तुम्हाला तणाव दूर करायला होईल.
टिक टॅक टो
'टिक टॅक टो' या गेमचं ओळखीचं नाव म्हणजे 'फुल्ली- गोळा'. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा गेम खेळतात. पण पेपरवर हा गेम खेळताना तुमच्या सोबत आणखी एक व्यक्ती त्यासाठी लागतं. पण गुगलवर हा गेम तुम्हाला एकट्याला खेळता येईल. हा गेम तुमच्या बरोबर गुगल खेळणार आहे.