स्मार्टफोन अलर्ट! Google ने 240 हून अधिक अँड्रॉईड अॅप्स केले ब्लॉक, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 03:33 PM2020-10-19T15:33:12+5:302020-10-19T15:34:02+5:30
Google Blocked 240 Android Apps : गुगलच्या सिक्योरिटी टीमने या अॅप्लिकेशन विरोधात कारवाई करत या अॅप्सला ब्लॉक केले आहे.
नवी दिल्ली - गुगलने पुन्हा एकदा कडक पाऊल उचललं असून प्ले स्टोरवरून तब्बल 240 हून अधिक मोबाईल अॅप्स ब्लॉक केले आहेत. हे सर्व अॅप्स अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर चालणारे होते. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स असतील तर लगेचच फोनमधून डिलीट करा. 240 अॅप युजर्संना वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती दाखवत होते. तसेच गुगलच्या नियमांचे उल्लंघन करीत होते. म्हणूनच गुगलने ही कारवाई केली आहे.
गुगलच्या सिक्योरिटी टीमने या अॅप्लिकेशन विरोधात कारवाई करत या अॅप्सला ब्लॉक केले आहे. यात सर्वात जास्त अॅप्स RAINBOWMIX ग्रुपचे आहे. ज्यात जुन्या गेम्ससह या ग्रुपच्या अॅप्सला रोज 1.4 कोटी लोकांपर्यंत पोहोचले होते. पॅक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 1.5 कोटी लोकांपर्यंत या जाहिराती पोहोचत होत्या.
अँड्रॉईड स्मार्टफोनमधून RAINBOWMIX ग्रुपचे अॅप्स लवकरात लवकर डिलीट करा गुगलने युजर्सला आव्हान केलं आहे. हे ग्रुप खूप दिवसांपासून गुगलच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. ज्यावेळी शोधकर्त्यांनी White Ops संस्थेच्या मदतीने या स्कॅमचा पर्दाफाश केला. त्यावेळी गुगलने ही मोठी कारवाई केली आहे. ज्या युजर्संना याचा त्रास होत होता. त्या फोनचा स्पीड खूप कमी झाली होती. त्यामुळे गुगलने हे अॅप्स ब्लॉक केले आहेत.
गुगल प्ले स्टोरवर याआधी वेळोवेळी खूप साऱ्या अॅप्सला ब्लॉक केले आहे. युजरच्या सुविधेसाठी हे पाऊल उचलले आहे. एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, मोबाईल अँड फ्रॉड इंडस्ट्री समोर मोठे आव्हान आहे. यामुळे युजर्संना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे धोकादायक अॅप्समुळे आवश्यक मोबाईल अॅप्सवरही त्याचा परिणाम होतो. गुगलने यासाठी कडक नियमावली बनवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Aadhaar Card : कसे काढता येणार पैसे?https://t.co/WFKeprK6FU#AadhaarCard#money#ATM
— Lokmat (@MiLOKMAT) October 19, 2020