अलर्ट! Google ने प्ले स्टोअरवरुन हटवले लहान मुलांचा डेटा चोरणारे "हे" Apps, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 04:32 PM2020-10-27T16:32:27+5:302020-10-27T16:39:29+5:30
Google Apps : गुगलने आणखी तीन अॅप्स हटवले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अॅप्स लहान मुलांची माहिती गोळा करत असल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली - गुगल प्ले स्टोअरवर वेळोवेळी अनेक अॅप्सला ब्लॉक केले आहे. युजर्सच्या सुविधेसाठी हे पाऊल उचललं आहे. यावेळीही गुगलने आणखी तीन अॅप्स हटवले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अॅप्स लहान मुलांची माहिती गोळा करत असल्याचं समोर आलं आहे. मुलाचा डेटा चोरी करीत असल्याचा आरोप या तीन अॅप्सवर करण्यात आला आहे. Princess Salon, Number Coloring आणि Cats & Cosplay ही तीन अॅप्स गुगलने हटवली आहेत.
डिजिटल अकाउंटेबिलिटी काउंन्सिलकडून याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ही तिन्ही अॅप्स विशेषत: मुलांसाठी तयार करण्यात आली होती. मात्र IDCA ने हे तीन अॅप्स युजर्सचा डेटा कलेक्ट करीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे अॅप्स गुगल प्ले स्टोरवरील नियमांचे उल्लंघन करीत होते. यामध्ये लहान मुलांच्या माहितीचा समावेश होता. व हा डेटा या अॅप कंपन्यांकडून थर्ड पार्टीला दिला जात होता. कंपन्यांकडून सातत्याने होत असल्याचा हा प्रकार आयडीएसीच्या रिसर्च टीमच्या लक्षात आलं. त्यामुळे या टीमने या तीन अॅप्सच्या कृतीबाबत गुगलला माहिती दिली.
गुगलने आम्ही रिपोर्टमध्ये सांगितलेले अॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या नियमांचं उल्लंघन करणारा अॅप आढळतो तेव्हा आम्ही त्यावर कारवाई करतो. या अॅप्सकडून कुठल्या प्रकारचा डेटा गोळा केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही अॅप्स लहान मुलांकडून वापरली जातात असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुगलने कडक पाऊल उचललं असून प्ले स्टोरवरून तब्बल 240 हून अधिक मोबाईल अॅप्स ब्लॉक केले आहेत. हे सर्व अॅप्स अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर चालणारे होते. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स असतील तर लगेचच फोनमधून डिलीट करा.
फॅक्ट चेक - WhatsApp वर एखादा व्हिडिओ पाहिलात तर फक्त 10 सेकंदात तुमचा फोन हॅक, 'हे' प्रकरण नेमकं आहे तरी काय?https://t.co/iSGDL4uzY1#WhatsApp#technology
— Lokmat (@MiLOKMAT) October 24, 2020
स्मार्टफोन अलर्ट! Google ने 240 हून अधिक अँड्रॉईड अॅप्स केले ब्लॉक, वेळीच व्हा सावध
240 अॅप युजर्संना वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती दाखवत होते. तसेच गुगलच्या नियमांचे उल्लंघन करीत होते. म्हणूनच गुगलने ही कारवाई केली आहे. गुगलच्या सिक्योरिटी टीमने या अॅप्लिकेशन विरोधात कारवाई करत या अॅप्सला ब्लॉक केले आहे. यात सर्वात जास्त अॅप्स RAINBOWMIX ग्रुपचे आहे. ज्यात जुन्या गेम्ससह या ग्रुपच्या अॅप्सला रोज 1.4 कोटी लोकांपर्यंत पोहोचले होते. पॅक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 1.5 कोटी लोकांपर्यंत या जाहिराती पोहोचत होत्या. अँड्रॉईड स्मार्टफोनमधून RAINBOWMIX ग्रुपचे अॅप्स लवकरात लवकर डिलीट करा गुगलने युजर्सला आव्हान केलं आहे. हे ग्रुप खूप दिवसांपासून गुगलच्या नियमांचे उल्लंघन करत आहे.
तुमच्या मोबाईलमध्ये हे Apps असल्यास लगेचच करा डिलीट अन्यथा...https://t.co/33c18Spvin#apps#Google#playstore
— Lokmat (@MiLOKMAT) October 19, 2020
WhatsApp युजर्ससाठी खूशखबर!https://t.co/0pRZCsr1WM#WhatsApp#technology
— Lokmat (@MiLOKMAT) October 20, 2020