एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडला 50 वर्षे पूर्ण, गुगलचं खास डुडल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 12:41 PM2019-06-04T12:41:21+5:302019-06-04T12:48:34+5:30

गुगलने यावेळी एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडवर खास डुडल तयार केले आहे. एलजीबीटीक्यू+ समुदायाकडून देशभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या 'प्राइड परेड'च्या थीमवर डुडल तयार करण्यात आले आहे.

google celebrates lgbtq pride with interactive doodle today shows 50 year long journey | एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडला 50 वर्षे पूर्ण, गुगलचं खास डुडल

एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडला 50 वर्षे पूर्ण, गुगलचं खास डुडल

Next
ठळक मुद्देगुगलने यावेळी एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडवर खास डुडल तयार केले आहे.एलजीबीटीक्यू+ समुदायाकडून देशभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या 'प्राइड परेड'च्या थीमवर डुडल तयार करण्यात आले आहे. प्राइड परेडचा 50 वर्षांचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. गुगलने यावेळी एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडवर खास डुडल तयार केले आहे. एलजीबीटीक्यू+ समुदायाकडून देशभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या 'प्राइड परेड'च्या थीमवर डुडल तयार करण्यात आले आहे. प्राइड परेडचा 50 वर्षांचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे. 

प्राइड परेडकडे समलैंगिक समुदायाचे हक्क आणि अधिकारांच्या मागणीचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. या परेडमध्ये एलजीबीटीक्यू+ लोक त्यांच्या अस्तित्वाचा अभिमान बाळगत उत्सव साजरा करतात. जगभरात ठिकठिकाणी अशा परेडचं आयोजन केलं जात असलं, तरी यंदाची न्यूयॉर्क येथील परेड आकर्षणाचा विषय ठरली आहे. एलजीबीटीक्यू+ समुदायाकडून दरवर्षी जून महिन्यात 'प्राइड परेड' काढली जाते. गुगलने आपल्या डुडलमध्ये एलजीबीटीक्यू+ प्राइड परेडचे 10-10 वर्षांनी बदलत जाणारे स्वरूप समोर आलं आहे. तसेच परेडचा 50 वर्षाचा काळ समोर आणला आहे.

Earth Day 2019: Google Doodle मधून पृथ्वीच्या सुंदरतेचं दर्शन

जगभरात 22 एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. गुगलने या खास दिवसाचे औचित्य साधून अ‍ॅनिमेटेड डुडल तयार केले होते. पृथ्वीवरील सजीव सृष्टीची नैसर्गिक दर्शन अ‍ॅनिमेटेड डुडलमधून देत गुगलने जागतिक वसुंधरा दिन दिन साजरा केला होता. गुगल डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील असे जीव, झाडांची माहिती देण्यात आली होती. आपण राहतो तो ग्रह किती अद्भूत आहे, हे दाखवण्याचा हा गुगलचा प्रयत्न होता. 

लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान

देशासह राज्यात लोकसभा निवडणूकीला सुरूवात झाल्यानंतर ‘गुगल’ सर्च इंजिनकडून भारत अन् भारताच्या लोकशाहीचा सन्मान ‘डुडल’ने करण्यात आला होता. गुगलकडून गुरूवारी (11 एप्रिल) मतदानाचे आकर्षक डुडल पेजवर झळकविण्यात आले होते. या डुडलच्या एका क्लिकवर मतदारांना मतदान प्रक्रियेविषयीची जागृतीपर माहिती सहजरित्या उपलब्ध होत होती. गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून या माध्यमातून दररोज कोट्यवधील ‘नेटीझन्स’ विविध माहिती जाणून घेण्यासाठी याचा उपयोग करतात. 

'www' ला 30 वर्षं पूर्ण! गुगलनं बनवलं खास डुडल

www म्हणजेच world wide web ला 30 वर्षं पूर्ण झाल्याच्या यानिमित्ताने याआधी काही दिवसांपूर्वी गुगलने एक खास डुडल तयार केलं होतं. कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असतात. त्यांना एकत्र जोडून वेबसाइट तयार केली जाते. वैज्ञानिक टीम बर्नर ली यांना या शोधाचे श्रेय जाते. गुगलने हे खास डुडल तयार करताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाला ही सलाम केला होता. एखादी वेबसाइट ओपन करण्यासाठी त्याआधी www टाकावे लागते. त्याशिवाय वेबसाइट ओपन होत नाही. त्यामुळेच world wide web ला  30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुगलने खास डुडल तयार केले होते. 
 

Web Title: google celebrates lgbtq pride with interactive doodle today shows 50 year long journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.