Google 23rd Birthday: 23व्या वाढदिवसानिमित्त खास गुगल डुडल; जाणून घ्या लाडक्या सर्च इंजिनविषयी मजेदार गोष्टी 

By सिद्धेश जाधव | Published: September 27, 2021 11:45 AM2021-09-27T11:45:14+5:302021-09-27T11:48:18+5:30

Google 23rd Birthday: कंपनीने गुगलच्या होमपेजवर केक थीम डूडल बनवून आपला वाढदिवस साजरा केला आहे.  

Google is celebrating 23rd birthday today birthday cake made on the homepage  | Google 23rd Birthday: 23व्या वाढदिवसानिमित्त खास गुगल डुडल; जाणून घ्या लाडक्या सर्च इंजिनविषयी मजेदार गोष्टी 

Google 23rd Birthday: 23व्या वाढदिवसानिमित्त खास गुगल डुडल; जाणून घ्या लाडक्या सर्च इंजिनविषयी मजेदार गोष्टी 

Next

Google’s 23rd Birthday: आज जगातील लोकप्रिय सर्च इंजिन गुगलचा 23वा वाढदिवस आहे. यासाठी कंपनीने Google च्या होमपेजवर खास केक थीम अ‍ॅनिमेटेड Doodle प्रकशित केले आहे. ज्यात Google च्या स्पेलिंगला केकचे रूप देण्यात आले आहे. तसेच यातील ‘L’ अक्षराचा वापर केक असलेल्या मेणबत्तीप्रमाणे करण्यात आला आहे. या केकवर ‘23’ लिहिण्यात आले आहे.  

Google ची स्थापना सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज यांनी 4 सप्टेंबर, 1998 रोजी केली होती. परंतु 27 सप्टेंबरला सर्च इंजिनवर पेज सर्चचा विक्रम केल्यानंतर कंपनीने आपला वाढदिवस 7 वर्षांनी बदलला. सध्या सुंदर पिचाई यांच्याकडे सीईओ पदाची धुरा सांभाळत आहेत.  

गुगलविषयी 5 मजेदार गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील:   

  • गुगलचे नाव सर्वात आधी Backrub (बॅकरब) ठेवण्यात आले होते, परंतु नंतर ते बदलण्यात आले.  
  • 16 ऑगस्ट 2013 रोजी गुगल 5 मिनिटांसाठी बंद पडलं होतं तेव्हा जगातील इंटरनेटचा वापर 40 टक्क्यांनी कमी झाला होता.  
  • 1997 मध्ये गुगलने आपली सर्च इंजिन सिस्टम Yahoo ला 2 दशलक्ष डॉलर्सला विकत घेण्याची ऑफर दिली होती. 
  • Google या शब्दाची निर्मिती Googol या शब्दपासून झाली आहे, ज्याचा अर्थ 1 मागे 100 शून्य असलेली संख्या असा आहे.  
  • सध्या गुगलचे होम पेज 100 भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात मराठीसह अनेक भारतीय भाषांचा देखील समावेश आहे.  

Web Title: Google is celebrating 23rd birthday today birthday cake made on the homepage 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल