सावधान!; फ्री किंवा ओपन इंटरनेट वापरणाऱ्यांना खुद्द सुंदर पिचाईंनीच सांगितला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 03:07 PM2021-07-13T15:07:02+5:302021-07-13T15:25:41+5:30
Google CEO Sundar Pichai Warns: आर्टिफिशीअल इंटेलिजंस महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे
सिलीकॉन व्हॅली: गुगल(Google) चे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) सुंदर पिचाई(Sundar Pichai) यांनी यूजर्सला मोठा इशारा दिला आहे. कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली येथील Google मुख्यालयात BBC ला ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जगभरातील फ्री आणि ओपन सोर्स इंटरनेटवर सायबर हल्ल्याचा धोका वर्तवला आहे.
यावेळी ते म्हणाले, अनेक देशात फ्री किंवा ओपन सोर्स इंटरनेटवर सायबर हल्ले होत आहेत. पण, हे देश इतर देशांपर्यंत माहिती पोहचवण्यास उशीर करत असल्याने इतर देशांनाही याचा धोका वाढला आहे. तसेच, चीनच्या पाळत ठेवणाऱ्या इंटरनेट मॉडेलविषयी विचारले असता, त्यांनी थेट चीनचे नाव घेणे टाळले. पण, गुगलचे कोणतेच प्रमुख प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेजचीनमध्ये चीनमध्ये उपलब्ध नसल्याचे सांगितले. याशिवाय त्यांनी यूजर्सना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन(Two-factor authentication) करण्यासही सांगितले.
मोबाईल कितीवेळ वापरावा ?
यावेळी सुंदर पिचाई यांनी मुलांसाठीचा स्क्रीन टाइम, पासवर्ड कधी आणि किती लवकर बदलायला हवा आणि ते किती मोबाइल वापरतात, यावरही भाष्य केले. त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही मुलांना कितीवेळ मोबाईल पाहू देता? ते म्हणाले की, मोबाईल कितीवेळ वापरावा, हे मी मुलांनाच ठरवू देतो. मोबाईल ही वयक्तिक बाब आहे आणि तो वापरणाऱ्याने याचा वापर कसा करायचा, हे ठरवावे.
पिचाई वापरतात 20 फोन
यावेळी पिचाई यांना त्यांच्या फोनची संख्या विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, मी सध्या 20 पेक्षा जास्त फोनचा वापर करतो. मी सतत फोन बदलत असतो. नवनवीन फोनची माहिती घेत असतो. तसेच, त्यांना आर्टिफिशीअल इंटेलिजंस(Artificial intelligence)बद्दल विचारण्यात आले असता. ते म्हणाले, हे तंत्रज्ञान माणसाने तयार केले आहे. हे एक महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. याची तुलना विज किंवा इंटरनेटसारख्या गोष्टींसोबत करता येईल. मी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला सर्वात ताकदवान तंत्रज्ञानाच्या रूपात पाहतो.
मी अमेरिकन नागरिक असलो तरी अंत:करणात भारतच
पिचाई यांनी यावेळी आपण आज जे काही आहोत त्यात भारताचा मोठा वाटा असल्याचे वक्तव्य केले. मी एक अमेरिकन नागरिक आहे, परंतु आजही माझ्या अंत:करणात भारत आहे. यामुळेच आज मी जे काही आहे त्यात भारताचा मोठा वाटा आहे, असे सुंदर पिचाई म्हणाले.
क्वॉन्टम कंप्यूटिंगमुळे बदल घडेल
सुंदर पिचाई यांनी सांगितल्यानुसार, क्वॉन्टम कंप्यूटिंग पूर्णपणे एक वेगळी कल्पना आहे. ही सामान्य कंप्यूटिंग बायनरीवर आधारीत आहे किंवा यांना बिट्स म्हणता येईल. क्वॉन्टम कंप्यूटर क्यूबिट्सवर काम करते. यामुळे एक पदार्थ एकाचवेळी अनेक स्टेट्समध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला इतक्या लवकर समजणे अवघड आहे, पण येणाऱ्या काळात यामुळे क्रांती नक्की घडेल, असे मत त्यांनी मांडले.