‘हे’ काम करा नाही तर हॅकर्स घेतील डिवाइसचा ताबा; Google Chrome आणि Mozilla युजर्स सावधान
By सिद्धेश जाधव | Published: June 9, 2022 05:25 PM2022-06-09T17:25:39+5:302022-06-09T17:25:53+5:30
Google Chrome आणि Mozilla मध्ये सापडलेल्या बग्समुळे सरकारी एजेंसी CERT-In नं भारतीय युजर्सना अलर्ट केलं आहे.
Google Chrome आणि Mozilla हे दोन भारतातीलच नव्हे तर जगातील लोकप्रिय ब्राऊजर आहेत. परंतु या ब्राउजर्समुळे युजर्सचा खाजगी डेटा आता हॅक होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारत सरकारच्या कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम अर्थात CERT-In नं सर्व भारतीय युजर्ससाठी एक धोक्याचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार गुगल क्रोम किंवा मोजिला युजर्सनी काळजी घेणं आवश्यक आहे. या दोन्ही वेब ब्राउजर प्लॅटफॉर्म्समध्ये काही गंभीर बग्स सापडले आहेत.
क्रोम आणि मोजिला युजर्ससाठी धोक्याची घंटा
CERT-In नं एक वॉर्निंग जारी की आहे, त्यानुसार क्रोम आणि मोजिलाच्या काही प्रॉडक्ट्समध्ये खूप गंभीर स्वरूपाचे बग्स सापडले आहेत. गुगलनं देखील या बग्सचा स्वीकार केला आहे. या बग्समुळे हॅकर्स कोणत्याही सामान्य युजरचा खाजगी डेटा अॅक्सेस करू शकतात. CERT-In ण हे बग्स हाय-रिस्क मार्क केले आहेत. यात क्रोम ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जन 96.0.4664.209 च्या आधीच्या व्हर्जनचा समावेश आहे.
तसेच मोजिलाच्या Mozilla Firefox iOS 101 च्या पूर्वीचे वर्जनन, Mozilla Firefox ESR व्हर्जन 91.10 पूर्वीचे, Mozilla Firefox Thunderbird व्हर्जन 91.10 पूर्वीचे व्हर्जन या बग्समुळे असुरक्षित आहेत, अशी माहिती CERT-In नं दिली आहे.
उपाय काय?
या सर्व सिक्योरिटी बग्स बाबत गुगलनं माहिती दिली आहे की, त्यांनी देखील हे बग्स चेक केले आहेत आणि त्यावर काम करून फिक्स करण्यात आले आहेत. Google नं यातून वाचण्यासाठी एक सल्ला युजर्सना दिला आहे. हॅकर्सच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी क्रोम आणि मोजिलाचे लेटेस्ट व्हर्जन तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहू शकता.