हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलने दिला सल्ला; 'हे' अ‍ॅप त्वरित करा अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 03:21 PM2019-11-04T15:21:02+5:302019-11-04T15:25:52+5:30

हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलनेच एक नवा सल्ला दिला आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर गुगल क्रोमचा वापर केला जातो. त्यामुळे गुगलने आता सर्व क्रोम युजर्सना आपलं ब्राऊजर अपडेट करायला सांगितलं.

google chrome browser users to update it with latest version for safe to hacking | हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलने दिला सल्ला; 'हे' अ‍ॅप त्वरित करा अपडेट

हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलने दिला सल्ला; 'हे' अ‍ॅप त्वरित करा अपडेट

Next
ठळक मुद्दे गुगलने आता सर्व क्रोम युजर्सना आपलं ब्राऊजर अपडेट करायला सांगितलं आहे.क्रोमसाठी एक फिक्स रोलआऊट केलं आहे. ज्याच्या मदतीने युजर्स हॅकिंगपासून वाचू शकतात. हॅकर्स सहजतेने ब्राऊजर मेमरीमध्ये स्टोर असलेला डेटा करप्ट अथवा मॉडिफाय करत आहेत.

नवी दिल्ली - हॅकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हॅकर्स अत्यंत शिताफीने युजर्सचा डेटा चोरत आहेत. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र आता हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलनेच एक नवा सल्ला दिला आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर गुगल क्रोमचा वापर केला जातो. त्यामुळे गुगलने आता सर्व क्रोम युजर्सना आपलं ब्राऊजर अपडेट करायला सांगितलं आहे. तसेच युजर्स क्रोमच्या लेटेस्ट व्हर्जनचा वापर करतील. 

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, क्रोमसाठी एक फिक्स रोलआऊट केलं आहे. ज्याच्या मदतीने युजर्स हॅकिंगपासून वाचू शकतात. ब्राऊजर अपडेट न केल्यास हॅकर्स युजर्सचं डिव्हाईस हॅक करू शकतात. गुगल क्रोमच्या या अपडेटच्या माध्यमातून जीरो डे वल्नरबिलिटी ठिक केली असल्याची माहिती डिजिटल ट्रेंड्सने दिली आहे. जुने व्हर्जन असलेल्या क्रोम बाऊजरवर हॅकिंगचं सावट आहे. 

हॅकर्स सहजतेने ब्राऊजर मेमरीमध्ये स्टोर असलेला डेटा करप्ट अथवा मॉडिफाय करत आहेत. यापासून वाचण्यासाठी फिक्स रोलआऊट करण्यात आले आहे. क्रोमचा विचार केल्यास कंपनीने आयओएस, मॅक, विंडोज आणि लिनक्सचं ब्राऊजर क्रोम 78 अपडेट केलं आहे. आयफोन युजर्सना या अपडेटसह सिस्टम वाईड डार्क मोड मिळाला आहे. डिस्प्ले आणि ब्राईटनेस सेटिंगमध्ये जाऊन डार्क मोड सिलेक्ट केल्यास गुगल क्रोम ते वेगळं ऑफ करण्याचा ऑप्शन देणार नाही. 

सोशल मीडियावर अनेकजण अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र हल्ली युजर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी WhatsApp, Facebook आणि गुगलच्या माहितीवर एका नव्या व्हायरसचं सावट असल्याचं समोर आलं होतं. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Pegasus नावाचा एक व्हायरस आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता आणखी एक व्हायरस आला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून शेकडो अँड्रॉईड युजर्स एका नव्या मालवेअरची तक्रार करत आहेत. हा नवा मालवेअर एकदा डिलिट केल्यानंतरही पुन्हा फोनमध्ये इन्स्टॉल होत आहे. तसेच स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट केल्यानंतरही तो पुन्हा फोनमध्ये येत असल्याचं युजर्सने म्हटलं आहे. Xhelper असं या मालवेअरचं नाव असून गेल्या सहा महिन्यांत 45 हजारांहून अधिक अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये आहे. Symantec च्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, Xhelper दररोज जवळपास 131 आणि दर महिन्याला सरासरी 2400 अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये शिरतो. भारत, अमेरिका, रशियामधील युजर्स हे या व्हायरसमुळे त्रस्त झाले आहेत.

 

Web Title: google chrome browser users to update it with latest version for safe to hacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.