Google Chrome ब्राऊजर आता आणखी सेफ; कडक सिक्योरिटीचा युजर्सला फायदाच फायदा होणार, जाणून घ्या कसा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 02:17 PM2021-03-04T14:17:07+5:302021-03-04T14:20:31+5:30

Google Chrome Browser : गुगल क्रोमचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.

google chrome planning for more security to users http prefixes load know benefits for users | Google Chrome ब्राऊजर आता आणखी सेफ; कडक सिक्योरिटीचा युजर्सला फायदाच फायदा होणार, जाणून घ्या कसा

Google Chrome ब्राऊजर आता आणखी सेफ; कडक सिक्योरिटीचा युजर्सला फायदाच फायदा होणार, जाणून घ्या कसा

Next

नवी दिल्ली - हॅकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हॅकर्स अत्यंत शिताफीने युजर्सचा डेटा चोरत आहेत. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुगल क्रोमचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. याच दरम्यान गुगल क्रोम ब्राऊजर (Google Chrome Browser) आता युजर्ससाठी आणखी कडक सुरक्षा (Security) करण्याच्या तयारीत आहे. गुगल क्रोम लवकरच एचटीटीपीला (http) डिफॉल्ट रुपात वापर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यावेळी युजर्स एचटीटीपी (http) आणि एचटीटीपीएस (https) प्रीफिक्स लिहिण्यास विसरतात, त्यावेळी हे उपयोगी ठरणार आहे. 

ब्राऊजरची सुरक्षा वाढवण्यासाठी क्रोम इंजिनिअर्सनी केलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे. सध्या एखाद्या युजरने एखादी लिंक टाईप केल्यास, क्रोम एड्रेस बार (यूआरएल), क्रोम प्रोटोकॉलची चिंता न करता टाईप केलेली लिंक लोड करतो. मात्र युजर्सनी प्रोटोकॉल न जोडल्यास, आता क्रोम प्रीफिक्स http जोडेल आणि http च्या माध्यमातून डोमेन लोड करण्याचा प्रयत्न करेल. क्रोम सुरक्षा इंजिनिअर एमिलि स्टार्कने दिलेल्या माहितीनुसार, हा बदल क्रोम 90 मध्ये बदल असेल.

Chrome मधील सुरक्षित ब्राउझिंग आपोआप धोकादायक जाहिरातींपासून युजर्सचं संरक्षण करेल आणि धोकादायक साईट्सवर भेट देण्यापूर्वी किंवा संशयास्पद फाईल डाउनलोड करण्यापूर्वी युजर्सला इशारा देईल, यामुळे युजर्सला मोठा फायदा होणार आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही क्रोमचा वापर करत असाल, तर तुमची पासवर्ड सुरक्षा आपोआप इनबिल्ट असेल. ज्यावेळी युजर्स असुरक्षित http पेजवर पासवर्ड किंवा पेमेंट कार्ड डेटासह एखादी संवेदनशील माहिती शेअर करतील, त्यावेळी क्रोम युजर्सला असुरक्षिततेबाबत सावध करेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका; केंद्र सरकारने जारी केले 7 फ्री टूल्स

 Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) भारतीय युजर्स संगणक, स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणांना नवीन व्हायरस बॉटनेटच्या अटॅकपासून बचाव करण्यासाठी 7 नवीन फ्री टूल्स दिली आहेत. MeitY ने हे पाऊल सायबर क्लीन सेंटर (बॉटनेट क्लीनिंग अँड मालवेअर अ‍ॅनालिसिस सेंटर) म्हणून उचललं आहे. इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) मार्फत हे टूल्स क्विक हील आणि ईस्कॅन सारख्या पार्टनर्ससोबत ऑपरेट केले जात आहेत. बॉटनेट्स हा इन्फेक्टटेड डिव्हाईसचा एक गट आहे जो हानिकारक काम करण्यासाठी एकत्रित काम करतो. हे डिव्हाईस हॅकर्सद्वारे नियंत्रित केले जातात. याच दरम्यान युजर्सना स्पॅम पाठवले जात आहेत. डेटा चोरी केला जात आहे. अनऑथोराइज्ड अ‍ॅक्सेस आहे ज्याद्वारे डीडीएसएसवर अटॅक केला जात आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

Web Title: google chrome planning for more security to users http prefixes load know benefits for users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.