Google Chrome चे 'हे' 5 सिक्रेट फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 03:17 PM2021-04-21T15:17:53+5:302021-04-21T15:18:05+5:30

Google Chrome : गुगल क्रोमचे असे काही सिक्रेट फीचर्स आहेत. त्याबाबत जाणून घेऊया...

Google Chrome top 5 secret features you should know about | Google Chrome चे 'हे' 5 सिक्रेट फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

Google Chrome चे 'हे' 5 सिक्रेट फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

googlenewsNext

नवी दिल्ली - जगभरात ब्राऊझिंगसाठी गुगल क्रोम (Google Chrome) चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. स्मार्टफोन असो किंवा मग संगणक, सर्व इंटरनेट युजर्स Google Chrome मध्ये ब्राऊझ करतात. मात्र अनेकांना यातील काही खास फीचर्सबाबत माहिती नाही. गुगल क्रोमचे असे काही सिक्रेट फीचर्स आहेत. त्याबाबत जाणून घेऊया...

Guest Mode 

जर तुम्हाला इंटरनेट ब्राऊजिंग सिक्रेट ठेवायचं असेल, तर या गेस्ट मोडचा वापर करता येऊ शकतो. यासाठी गुगल अकाऊंट अवतारवर जाऊन गेस्ट मोडवर क्लिक करुन याचा वापर करा.

In-built scanner

गुगल क्रोममध्ये एक इन-बिल्ट स्कॅनरही असतो, ज्याचा वापर करुन युजर सिस्टम स्कॅन करुन व्हायरस हटवू शकतात. स्कॅन करण्यासाठी सेटिंगमध्ये एडवान्स ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर रिसेट आणि क्लिन-अप ऑप्शनवर क्लिक करुन व्हायरस स्कॅन करता येईल.

Send your device option

सेंड युअर डिव्हाईस ऑप्शनचा वापर करुन युजर आपल्या कम्प्यूटर किंवा लॅपटॉपवर ओपन टॅबचा आपल्या फोनमध्येही वापर करू शकतात. यासाठी युआरएलवर जाऊन राईट क्लिक करावं लागेल, त्यानंतर सेंड युअर डिव्हाईसवर क्लिक करावं लागेल.

Cast option

कास्ट ऑप्शनद्वारे युजर आपल्या क्रोमकास्ट डिव्हाईसवर आपल्या ब्राऊजर टॅबचा वापर करू शकतात. कास्ट ऑप्शनवरुन यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मचाही एक्सेस करू शकता. या फीचरचा वापर करण्यासाठी उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करावं लागेल. येथे खाली कास्ट ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करुन याचा वापर करता येईल.

गुगलने आपल्या ब्लॉगद्वारे जानेवारी 2021 मध्ये एक खास फीचर लाँच केलं होतं. ज्यात युजर्स गुगल क्रोम ब्राऊजरवर स्क्रिन शेअरिंगदरम्यान नोटिफिकेशन्स हाईड करू शकतील. या फीचरच्या वापरानंतर युजरचं कोणतंही नोटिफिकेशन व्हिडीओ कॉलिंगमध्ये स्क्रिन शेअरिंग दरम्यान इतरांना दिसणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

Web Title: Google Chrome top 5 secret features you should know about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.