अलर्ट! क्रोम ब्राऊजर वापरता? मग त्वरित करा अपडेट; गुगलने दिला हॅकचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 07:33 PM2021-09-27T19:33:42+5:302021-09-27T19:34:01+5:30

Google Chrome zero-day hack: गुगलने CVE-2021-37973 या एक्सप्लॉइटची माहिती आपल्या ब्लॉगमधून दिली आहे. Google Chrome मधील हा हॅक गुगलच्या कर्मचाऱ्यांनी शोधून काढला आहे.  

Google chrome zero day hack google warns users update chrome browser at the earliest  | अलर्ट! क्रोम ब्राऊजर वापरता? मग त्वरित करा अपडेट; गुगलने दिला हॅकचा इशारा 

अलर्ट! क्रोम ब्राऊजर वापरता? मग त्वरित करा अपडेट; गुगलने दिला हॅकचा इशारा 

Next

गुगलच्या कर्मचाऱ्यांनी क्रोम ब्राऊजरमधील एका हॅकचा शोध लावला आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगमधून याची माहिती दिली आहे आणि युजर्सना त्वरित क्रोम ब्राऊजर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. हे जगातील 2 अब्ज गुगल क्रोम ब्राउजर युजर्ससाठी वाईट बातमी आहे. कंपनीने CVE-2021-37973 साठी एक एक्सप्लॉइट मिळाल्याची माहिती मिळाली आहे, जो एक zero-day एक्सप्लॉइट आहे. म्हणजे गुगलला समजण्याआधी सायबर क्रिमिनल या हॅकचा फायदा घेऊन झाले आहेत.  

गुगलने या हॅकचा शोध लागल्यानंतर क्रोम वापरकर्त्यांना आपला ब्राउजर अपडेट करण्याची सूचना दिली आहे. या झिरो डे हॅकमुळे जवळपास सर्व Google Chrome युजर्सना हॅक होण्याचा धोका आहे. कंपनीने या एक्सप्लॉइटची माहिती एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.  

Google Chrome zero-day hack 

कंपनीच्या ब्लॉगनुसार, CVE-2021-37973 चा एक्सप्लॉइट गुगल कर्मचाऱ्यांनी शोधून काढला होता. हा एक zero-day एक्सप्लॉइट आहे, त्यामुळे जर गुगलला याची माहिती आधी मिळाली असती तर कंपनीने अपडेट जारी केला असता. सायबर गुन्हेगार या हॅकचा फायदा घेऊ शकत होते. तसेच जोपर्यंत सर्व युजर्स क्रोम अपडेट करत नाहीत तोपर्यंत या बगचे विवरण गुपित ठेवण्यात येईल.  

कंपनीने ही समस्या सोडवण्यासाठी पॅच जारी केला आहे आणि युजर्सना शक्य तितक्या लवकर आपला ब्राउजर अपग्रेड करण्यास सांगितले आहे.  

अशाप्रकारे मिळावा Google Chrome ब्राउजरचा अपडेट: 

  • Google Chrome च्या सेटिंग्समध्ये जा 
  • Help मधील Google Chrome च्या About सेक्शन मध्ये जा 
  • इथे तुमच्या क्रोमचे व्हर्जन चेक करा 
  • Google Chrome व्हर्जन 94.0.4606.61 किंवा त्यावरील व्हर्जन सुरक्षित आहे 
  • जर तुमच्याकडे हे व्हर्जन नसेल तर अपडेटचा ऑप्शन मिळेल.  

Web Title: Google chrome zero day hack google warns users update chrome browser at the earliest 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.