Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:29 PM2020-03-31T12:29:47+5:302020-03-31T12:31:18+5:30

Coronavirus : लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. व्हिडीओ कॉलच्या मदतीने ऑफिसमधील लोकांशी महत्त्वाची चर्चा करता येते.

google duo video chat app group calling limit increase to 12 people SSS | Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार

Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. घरात बसून राहावे लागत असल्याने अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे. लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. व्हिडीओ कॉलच्या मदतीने ऑफिसमधील लोकांशी महत्त्वाची चर्चा करता येते. अनेक अ‍ॅपवर मर्यादित लोकांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येणं शक्य आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र यावर उपाय  म्हणून गुगलने युजर्ससाठी पुढाकार घेतला आहे.

व्हिडिओ कॉलची गंमत आता आणखी वाढणार असून एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार आहेत. गुगलने आपलं व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप असणाऱ्या गुगल ड्युओ (Google Duo) वर एकाच वेळेस व्हिडिओ कॉल करता येणाऱ्या युजर्सची संख्या वाढवली आहे. त्यामुळे गुगल ड्युओच्या माध्यमातून एकाच वेळी आता 12 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. याआधी ही मर्यादा आठ होती. गुगलचे वरिष्ठ मार्गदर्शक (प्रोडक्ट मॅनेजमेंट) सनाज अहरी लेमेलसन यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

'आपल्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी ड्युओचा वापर करणाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत. आम्हाला माहीत आहे सध्याच्या काळात व्हिडिओ कॉल अत्यंत महत्त्वपूर्ण सेवांपैकी एक आहे. म्हणूनच आम्ही आज ग्रुप कॉलिंगची मर्यादा आठवरुन बारापर्यंत वाढवली आहे' असं ट्विट लेमेलसन यांनी यांनी केलं आहे. तसेच भविष्यात यामध्ये आणखी काही बदल केले जातील असे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहेत. गुगल ड्युओमध्ये 12 जणांना व्हिडिओ कॉल करण्याचे फिचर अ‍ॅक्टिव्ह झालं आहे. मात्र कोरोनानंतर ही मर्यादा पुन्हा आठ करण्यात येणार आहे का याबद्दल कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम असून यावरून एका वेळी चार जणांना व्हिडिओ कॉलवर करता येते. तर आता गुगल ड्युओमध्ये 12 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. काही अ‍ॅपच्या मदतीने तर एकाच वेळी 100 जणांना कॉल करता येतो. अ‍ॅपलच्या फेसटाईप अ‍ॅपवर एकाचवेळी 32 तर स्काईप आणि फेसबुक मेसेंजरवर एकाच वेळी 50 जण तर झूम अ‍ॅपमध्ये एकाच वेळी 100 जणांना व्हिडिओ कॉल करता येतो.

 महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : आता 14 नाही तर 28 दिवसांचे होम आयसोलेशन, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

Coronavirus : हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट

Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या

coronavirus : जगभरात कोरोनामुळे 37 हजार जण मृत्युमुखी, अमेरिका, इटलीमध्ये भीषण परिस्थिती

Coronavirus:...म्हणून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी केला नरेंद्र मोदींचा उल्लेख; लॉकडाऊनचा विरोध

 

Web Title: google duo video chat app group calling limit increase to 12 people SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.