नोकरी शोधणं होणार आणखी सोपं; Google ने लॉन्च केली 'ही' नवी सर्व्हिस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 02:47 PM2019-09-20T14:47:49+5:302019-09-20T15:13:43+5:30
नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आता एक खूशखबर आहे. कंपनीने Google Pay च्या माध्यमातून नोकरी शोधण्यासाठी एक पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - गुगल हे सर्वाधिक वापरलं जाणारं लोकप्रिय सर्च इंजिन आहे. Google For India 2019 या कार्यक्रमात कंपनीने अनेक घोषणा केल्या आहेत. नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आता एक खूशखबर आहे. कंपनीने Google Pay च्या माध्यमातून नोकरी शोधण्यासाठी एक पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. गुगल पे च्या माध्यमातून तरुणांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी थेट अर्ज करता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गुगलने Google Job Search हे फीचर याआधी लॉन्च केले आहे. मात्र आता अशाच पद्धतीचे फीचर हे गुगल पे अॅपमध्ये युजर्सना मिळणार आहे. या फीचरचा तरुणांना नोकरी शोधण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच याच्या माध्यमातून बेसिक आणि पार्ट टाईम जॉब शोधण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी गुगलने अनेक कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. गुगल पे मध्ये नोकरी संबंधी एक पर्याय देण्यात येणार आहे. त्यामध्ये युजर्स आपलं प्रोफाईल तयार करू शकतात. तसेच शिक्षण आणि अनुभव याची माहिती देऊ शकतात.
Introducing the new Jobs Spot on Google Pay, which helps people find entry-level jobs in fast-growing industries like retail, hospitality and on-demand businesses. #GoogleForIndiapic.twitter.com/Ir1LbOkxMy
— Google Pay India (@GooglePayIndia) September 19, 2019
युजर्सची आवड आणि अनुभव या आधारावर नोकरीचे रिकमंडेशन मिळेल. तसेच येथून नोकरीसाठी थेट अप्लाय करता येणार आहे. सध्या हे फीचर दिल्ली-एनसीआरसाठी सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर पूर्ण भारतात हे सुरू करण्यात येणार आहे. कंपनीने यासाठी स्किल इंडियासोबत पार्टनरशिप केली आहे. गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून त्याचा वापर विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी केला जातो. गुगल असिस्टंट अपडेट होत असतं. यामध्ये अनेक नवनवीन फीचर येत असतात.
Google For India 2019 या कार्यक्रमात Google Assistant हिंदी भाषेमध्ये बोलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुगलने हिंदीसोबत आणखी पाच भाषांचा देखील समावेश केला आहे. यामध्ये मराठी, बांग्ला, तेलुगू, उर्दू आणि तमिळ भाषेचा समावेश आहे. भारतीय युजर्स Google Assistant वर 'Ok Google, Hindi bolo' बोलून हिंदीमध्ये सर्च करू शकतात. तर 'Talk to me in Hindi' बोलून हिंदीत संवाद साधू शकतात. युजर्सना हिंदी न्यूज पाहायची असल्यास 'Ok Google, Hindi news' बोला म्हणजे समोर हिंदी भाषेतील बातमी ओपन होईल. यासोबतच गुगल व्हॉईस कमांड सर्व्हिसवर देखील काम करत आहे. म्हणजेच पिझ्झा ऑर्डर करायचा असल्यास केवळ व्हॉईस कमांडचा वापर केला जाणार आहे.
Ok Google, Hindi bolo; आता हिंदीत बोलणार Google Assistanthttps://t.co/7vhDCEMxJX#GoogleAssistantpic.twitter.com/nM28WYyMeM
— Lokmat (@MiLOKMAT) September 19, 2019
Google Assistant ने भारतात आपली फोन लाईन असिस्टेंट सर्व्हिस टेलिकॉम कंपनी वोडाफोनसोबत मिळून हे लॉन्च केलं आहे. यासाठी कोणताही जास्तीचा चार्ज देण्याची गरज नाही. तसेच इंटरनेटची ही गरज नाही. या सर्व्हिसचा उपयोग करण्यासाठी 0008009191000 नंबर डायल करा. या नंबरवर फोन करून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर प्राप्त करू शकता. ही सर्व्हिस हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये काम करणार आहे.