गुगलने ऐन दिवाळीत दिला झटका! कंपनी बंद करणार खाती; जाणून घ्या तुमचं अकाऊंट आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 02:13 PM2023-11-13T14:13:29+5:302023-11-13T14:13:49+5:30

गुगलने ऐन दिवाळीतच काही खात्यांवर कारवाई केली आहे.

Google gave a blow in Diwali! accounts to be closed by the company; Do you have an account? | गुगलने ऐन दिवाळीत दिला झटका! कंपनी बंद करणार खाती; जाणून घ्या तुमचं अकाऊंट आहे का?

गुगलने ऐन दिवाळीत दिला झटका! कंपनी बंद करणार खाती; जाणून घ्या तुमचं अकाऊंट आहे का?

दिवाळीच्या मुहूर्तावर लाखो जीमेल युजर्संना गुगलने मोठा धक्का दिला आहे. कंपनी लाखो निष्क्रिय Gmail खाती बंद करणार आहे, ही प्रक्रिया १ डिसेंबरपासून लागू केली जाणार आहे. यामध्ये बऱ्याच काळापासून निष्क्रिय असलेली जीमेल खाती कायमची बंद केली जाणार आहेत. जर तुम्ही देखील Gmail वापरकर्ता असाल आणि तुमचे Gmail खाते खूप दिवसांपासून उघडले नसेल तर तुमच्या खात्यावरही कारवाई होऊ शकते. 

WhatsApp आणि SMS वरील ७ मेसेजवर क्लिक करताच भानगडी वाढणार; मोठी फसवणूक होण्याची शक्यता

जीमेल (Gmail) आणि इतर अनेक खाती Google खात्याच्या मदतीने सुरू असतात. तुमचे Gmail खाते हटवले गेल्यास, तुम्हाला त्या इतर सेवाही गमवाव्या लागतील. तुमचे खाते हटवण्यापूर्वी, Google तुम्हाला ईमेलद्वारे आवश्यक माहिती देईल, जेणेकरून तुम्हाला हवे असल्यास तुमचे खाते सेव्ह करता येईल.

तुम्ही गेल्या २ वर्षांपासून तुमचे Google खाते वापरले नसल्यास, तुम्ही ते पुन्हा सक्रिय करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीच्या विविध सेवा वापराव्या लागतील. Google ड्राइव्ह वापरणे. YouTube व्हिडिओ पाहणे किंवा फोटो शेअर करणे.

Play Store वरून अॅप डाउनलोड करणे किंवा Google search वापरून काहीही शोधणे. कोणत्याही तृतीय पक्ष अॅप किंवा वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी Google खाते वापरणे इ. हे सर्व असल्यास तुमचे खाते हटवले जाणार नाही.

तुम्ही तुमच्या Google खात्यातून कोणतेही उत्पादन किंवा सेवा खरेदी केली असल्यास, तुमचे खाते हटवले जाणार नाही. त्याचप्रमाणे, ज्या अकाऊंटवरून YouTube व्हिडीओ पोस्ट केले आहेत ते देखील सुरक्षित राहतील. तुम्ही तुमचे खाते तुमच्या मुलांच्या खात्याशी लिंक केले असल्यास ते सुरक्षित राहील. ज्यांनी अॅप पब्लिशिंगसाठी गुगल अकाउंटचा वापर केला आहे, ती खातीही सुरक्षित राहतील.

Web Title: Google gave a blow in Diwali! accounts to be closed by the company; Do you have an account?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.