ChatGPT पेक्षा पॉवरफूल आहे Google चे Gemini AI, वापर कसा करावा? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:13 PM2023-12-11T15:13:50+5:302023-12-11T15:14:32+5:30
Google Gemini AI: गूगलने नुकताच आपला नवीन Gemini AI चॅटबॉट लॉन्च केला आहे.
How to use Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगावर राज्य करण्यासाठी Google सज्ज झाले आहे. ChatGPT सारख्या AI टूलला टक्कर देण्यासाठी गुगलने Gemini AI लॉन्च केले आहे. कंपनीने दावा केलाय की, हे त्यांचे सर्वात पॉवरफुल AI टूल आहे. आतापर्यंत Open AI च्या ChatGPT ला सर्वात शक्तीशाली AI टूल मानले जायचे. गुगलचे Gemini AI आल्यानंतर ही स्पर्धा अधिकच रंजक झाली आहे.
Google च्या दाव्यानुसार, Gemini AI अॅडव्हान्स रिजनिंग, प्लॅनिंग आणि समजून घेण्याच्या बाबतीत अतिशय प्रगत आहे. तुम्हालाही या नवीन AI चॅटबॉटचा अनुभव घ्यायचा असेल, तर याच्या दोन पद्धती आहेत. तुम्ही या दोन्ही पद्धतीत अगदी मोफत Gemini AI चा वापर करू शकता.
Google Bard मध्ये चालणार Gemini AI
गूगलने त्यांच्या BARD चॅटबॉटसोबत Gemini AI जोडले आहे. तुम्ही बार्डद्वारे Gemini AI चा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला BARD च्या वेबसाइटवर जावून Google अकाउंटने लॉगइन करावं लागेल. तुम्ही टाईप करुन BARD ला काहीही विचारू शकता, यानंतर गूगलचे AI टूल Gemini Pro च्या मदतीने तुम्हाला उत्तर देईल. हे नवीन AI टूलच्या 3 व्हर्जन्सपैकी एक आहे.
We believe in making AI helpful for everyone. That’s why we’re launching Gemini, our most capable model that’s inspired by the way people understand and interact with the world. #GeminiAIpic.twitter.com/gNG9ha9xMO
— Google (@Google) December 6, 2023
सध्या टेक्स्टसोबतच फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ बनवण्यावर काम सुरू आहे. गूगल पुढच्या वर्षी BARD चे नव्हीन Bard Advanced लॉन्च करणार आहे. यात Gemini Ultra चा वापर केला जाईल, जे Gemini चे सर्वात पॉवरफुल व्हर्जन असेल.
Pixel 8 Pro मध्ये Gemini AI चालणार
तुमच्याकडे Google Pixel 8 Pro स्मार्टफोन असेल, तर यात तुम्ही Gemini AI चा वापर करू शकता. विशेष म्हणजे, तुम्ही इंटरनेटशिवाय Gemini AI चा वापर करू शकता. स्मार्ट रिप्लाय आणि रेकॉर्डरसोबत Gemini Nano चा अनुभव मिळेल. स्मार्ट रिप्लायद्वारे Gemini AI कीबोर्डमध्ये सजेशन देईल, तर रेकॉर्डरमध्ये कंटेंटची समरी मिळेल.