भारतात लॉन्च झाले Google चे Gemini Mobile app, मराठीसह 9 भाषांचा पर्याय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:07 PM2024-06-20T22:07:27+5:302024-06-20T22:08:58+5:30

Google ने आपले AI Assistant- Gemini Mobile App भारतात लॉन्च केले आहे.

Google Gemini Mobile App : Google's Gemini Mobile app launched in India, 9 language options including Marathi | भारतात लॉन्च झाले Google चे Gemini Mobile app, मराठीसह 9 भाषांचा पर्याय...

भारतात लॉन्च झाले Google चे Gemini Mobile app, मराठीसह 9 भाषांचा पर्याय...

Google Gemini Mobile App : Google ने अखेर आपले बहुचर्चित AI Assistant- Gemini Mobile App भारतात लॉन्च केले आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. भारतात लॉन्च झालेल्या या ॲपमध्ये 9 भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि मल्याळम, मराठी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या नावांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीने Google Messages साठीही Gemini लॉन्च केले आहे, जे इंग्रजी भाषेला सपोर्ट करेल.

Gemini App अॅक कसे वापरायचे?

Google च्या म्हणण्यानुसार, विविध भाषिक लोकांना फायदा व्हावा, यासाठी Gemini App मध्ये अनेक भाषांचा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे युजर्स अतिशय सहज याचा वापर करू शकतील. प्ले स्टोअरवरून Gemini App इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही अतिशय सहजपणे त्याच्याशी संवाद साधू शकतात आणि सूचना देऊ शकतात. या ॲपवर सूचनांसाठी टाइप करणे, बोलणे आणि फोटो अपलोडचा पर्याय आहे. Gemini App मध्ये अतिशय सोपा इंटरफेस पाहायला मिळेल. 

व्हॉईस कमांड देऊ शकता
युजर्स 'Hey Google' बोलून व्हॉइस कमांड देऊ शकतात किंवा होम बटणावर टॅप करून अॅक्टिव्ह करू शकता. याच्या मदतीने तुम्ही टायमर सेट करणे, कॉल करणे, रिमांयडर सेट करणे, यांसारखी कामे करू शकता. Android आणि iOS युजर्स याचा वापर करू शकतात. 

Gemini Advanced मोफत उपलब्ध होईल
Google ने चार महिन्यांपूर्वी अमेरिकेत हे ॲप लॉन्च केले होते. आता हे 9 भारतीय भाषांसह भारतात लॉन्च करण्यात आले आहे. Gemini Advanced साठी शुल्क भरावा लागेल, मात्र पहिल्या दोन महिन्यांसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. त्यानंतर 1950 रुपये शुल्क भरावे लागेल. या किमतीत Gemini Advanced सोबतच तुम्हाला 2TB गुगल स्टोरेज मिळेल.

Web Title: Google Gemini Mobile App : Google's Gemini Mobile app launched in India, 9 language options including Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.