'ही' २२ अॅप गुगलने हटवली; तुमच्याकडे यातलं अॅप नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:51 PM2018-12-10T12:51:41+5:302018-12-10T12:52:00+5:30

गुगलनं प्ले स्टोअरवरून व्हायरस पसरवणारे 22 अॅप्लिकेशन हटवले आहेत.

google has removed 22 malicious apps from play store | 'ही' २२ अॅप गुगलने हटवली; तुमच्याकडे यातलं अॅप नाही ना?

'ही' २२ अॅप गुगलने हटवली; तुमच्याकडे यातलं अॅप नाही ना?

Next

नवी दिल्ली- गुगलनं प्ले स्टोअरवरून व्हायरस पसरवणारे 22 अॅप्लिकेशन हटवले आहेत. ब्रिटनची सायबर सिक्युरिटी कंपनी असलेल्या सोफोसनं या सर्व 22 अॅप्लिकेशनमध्ये व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. या अॅप्समुळे युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेला बाधा पोहोचू शकते, असंही सोफोसनं स्पष्ट केलं आहे.

ही अॅप्स 20 लाखांहून अधिक युझर्सनी डाऊनलोड केली आहेत. त्यातील 19 अॅप्स याच वर्षी जून महिन्यात प्ले स्टोअरवर आली होती. या अॅप्समुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकरच संपते. सोफोसच्या मते ही 22 अॅप्स एका व्हायरससारखं काम करतात. तसेच हे अॅप फेक क्लिक करून महसूल मिळवत असल्याचंही समोर आलं आहे. तसेच युजर्सला फेक रिक्वेस्टही पाठवली जाते. अॅप्समध्ये व्हायरस असल्यामुळे युजर्सची बॅटरीही लवकर संपत असून, ही अॅप्स डेटाही मोठ्या प्रमाणात वापरतात.  
 

1
पार्केल फ्लॅशलाइट (Parkle FlashLight)
2
स्नेक अटॅक( Snake Attack)
3
मॅथ सॉलवर (Math Solver)
 
4
शेप सॉर्टर (ShapeSorter)
5
टेक अ ट्रिप (Tak A Trip)
6
मॅग्निफिये (Magnifeye)
7
जॉइन अप (Join Up)
8
ज़ॉम्बी किलर (Zombie Killer)
9
स्पेस रॉकेट (Space Rocket)
10
नियॉन पॉन्ग (Neon Pong)
11
जस्ट फ्लॅशलाइट (Just Flashlight)
12
टेबल सॉसर (Table Soccer)
13
क्लिफ डाइवर (Cliff Diver)
14
बॉक्स स्टॅक (Box Stack)
15
जेली स्लाइस (Jelly Slice)
16
एके ब्लॅकजॅक (AK Blackjack)
17
कलर टाइल्स (Color Tiles)
18
एनिमल मॅच (Animal Match)
19
रुलेट मेनिया (Roulette Mania)
20
हेक्सा फॉल (HexaFall)
21
हेक्सा ब्लॉक्स (HexaBlocks)
22
पेयर ज़ैप (PairZap)

 

Web Title: google has removed 22 malicious apps from play store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल