Google ने जगाला केलं चकित; बनवलं माणसासारखा विचार करणारं AI टूल, ChatGPTही फेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 11:31 AM2023-12-07T11:31:32+5:302023-12-07T11:32:12+5:30
गुगलने आपलं नवीन प्रोडक्ट आणलं आहे. कंपनीने Gemini AI नावाचं पॉवरफुल आर्टिफिशियल इंटेलीजेन्स सिस्टम (AI) लाँच केली आहे.
गुगलने OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Bard लाँच केलं आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आलेल्या AI टूलने लोकांना ChatGPT इतकं आकर्षित केलं नाही. आता गुगलने आपलं नवीन प्रोडक्ट आणलं आहे. कंपनीने Gemini AI नावाचं पॉवरफुल आर्टिफिशियल इंटेलीजेन्स सिस्टम (AI) लाँच केली आहे.
Bard chatbot चा देखील यात समावेश करण्यात आला आहे, जो बार्ड युजर्सना अपग्रेड म्हणून मिळेल. Gemini या नवीन मॉडेलच्या मदतीने गुगलला OpenAI च्या GPT-4 आणि Meta च्या Llama 2 शी टक्कर द्यायची आहे. जेमिनी एआय अपडेट लवकरच जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल.
Gemini AI खूप एडवान्स आहे आणि रिअल टाइममध्ये मल्टीटास्किंग करण्यास सक्षम असेल. हे एकाच वेळी टेक्स्ट, इमेज, कोड आणि व्हिडीओ अशा विविध प्रकारच्या माहितीवर काम करण्यास सक्षम असेल. याशिवाय रीजनिंग, कोडिंग आणि प्लॅनिंग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची क्षमता आहे.
तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
Gemini AI युजर्स आणि त्यांच्या गरजेनुसार तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल. पहिला अल्ट्रा असेल, हाय कॉम्प्लॅक्स टास्क कंप्लीट करण्यास सक्षम असेल. याशिवाय प्रो आणि नॅनो आहेत. सुरुवातीला ते इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल आणि 170 हून अधिक देशांमध्ये वापरता येईल. आगामी काळात इतर भाषांचा सपोर्ट जोडला जाईल.
जबरदस्त स्पीड
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, हा एक अविश्वसनीय क्षण आहे आणि आम्ही फक्त जे शक्य आहे त्याचा पृष्ठभाग स्क्रॅच केला आहे (म्हणजेच, आम्ही शक्यतांच्या केवळ एका भागापर्यंत पोहोचू शकलो आहोत).
गुगल डीपमाइंडचे वाइस प्रेसिडेंट ऑफ प्रोडक्ट एली कॉलिन्स यांनी एका ब्रीफिंग दरम्यान सांगितलं की, हे पहिलं एआय मॉडेल आहे, जे मानवी तज्ञांनी सेट केलेल्या बेंचमार्कच्या पुढे आलं आहे.
बार्डसाठी दोन फेजमध्ये जारी
गुगल असिस्टंट आणि बार्डचे वाइस प्रेसिडेंट सिसी हसियाओ यांनी सांगितलं की, जेमिनी एआय दोन टप्प्यांमध्ये बार्डसाठी जारी केले जाईल. बार्डसाठी एक स्पेशल ट्यून केलेलं व्हर्जन प्रसिद्ध केलं जाईल, जी जेमिनी प्रो असेल. हे 6 डिसेंबरपासून सुरू झालं आहे. त्याच्या मदतीने, चॅटबॉट अधिक चांगला होईल, त्यानंतर तो रीजनिंग, कोडिंग आणि प्लानिंग पूर्वीपेक्षा चांगले समजू शकेल.