Google चे नवीन फिचर सादर; अशी करा 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट 

By सिद्धेश जाधव | Published: July 17, 2021 05:23 PM2021-07-17T17:23:47+5:302021-07-17T17:24:49+5:30

Google adds new feature: युजर्सच्या गुगलने प्रायव्हसीसाठी एक नवीन फीचर सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स मागच्या 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट करू शकतील.  

Google introduced a new feature for privacy now users can auto delete last 15 minutes search history  | Google चे नवीन फिचर सादर; अशी करा 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट 

Google चे नवीन फिचर सादर; अशी करा 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट 

Next

Google ने सर्च ऑप्शनसाठी एक नवा अपडेट दिला आहे. या अपडेटमध्ये गुगलवर मागच्या 15 मिनिटांत सर्च केलेल्या गोष्टी युजर्स फक्त दोन क्लिककरून कायमस्वरूपी डिलीट करू शकतील. या फीचरमुळे युजर्सची प्रायव्हसी प्रायव्हसी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या हे नवीन फीचर आयओएस डिव्हाइसेससाठी सादर करण्यात आले आहे परंतु लवकरच हे अँड्रॉइड डिवाइसवर देखील उपलब्ध होऊ शकते.  (Google adds new feature to allow users delete last 15 minutes of search history)

विशेष म्हणजे Google ने गेल्यावर्षी सर्च हिस्ट्रीसाठी ऑटो डिलीट हिस्ट्री फीचर सादर केले होते. त्याच फिचरमध्ये लास्ट 15 मिनिटांची हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्याय जोडला आहे. हे फीचर आल्यामुळे युजर्सना सर्च हिस्ट्री मॅन्युअली डिलीट करावी लागणार नाही.  

असे करा नवीन फीचर सेट 

  • सर्वप्रथम गुगल अकॉउंट बनवा. 
  • गुगल अकॉउंट मेन्यू मध्ये जा. 
  • तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा. 
  • तिथे तुम्हाला एक नवीन Quick Delete चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • आता तुम्हाला Delete Last 15 Minutes चा ऑप्शन दिसेल, तो क्लिक करा. 
  • आता शेवटच्या 15 मिनिटांत तुम्ही गुगलवर जे काही सर्च केले असेल ते आपोआप डिलीट होईल. 

व्हॉइस कमांड देऊन वापर हे फिचर 

तुम्ही या फीचरचा वापर Google Assistant ला कमांड देऊन देखील करू शकता. तुम्ही व्हॉइस कमांड दिल्यानंतर तुम्हाला ऑटो-डिलीट ऑप्शन मिळतील. या ऑप्शनमध्ये 3 महिने, 18 महिने आणि 36 महिन्यांपैकी एका ऑप्शनची निवड करता येईल.  

Web Title: Google introduced a new feature for privacy now users can auto delete last 15 minutes search history 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.