काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 01:05 PM2020-07-18T13:05:33+5:302020-07-18T13:16:42+5:30
गुगलवरून ग्राहक लवकरच खाद्यपदार्थांची घरपोच ऑर्डर मागवू शकणार आहेत.
नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र आता घरबसल्या गुगलवरून खाद्यपदार्थाची ऑर्डर देता येणार आहे. गुगल लवकरच भारतात फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार आहे. गुगलच्या या निर्णयामुळे स्विगी, झोमॅटो यासारख्या लोकप्रिय कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
गुगलवरून ग्राहक लवकरच खाद्यपदार्थांची घरपोच ऑर्डर मागवू शकणार आहेत. कंपनीने भारतात फूड डिलिव्हरी सेवेच्या चाचणीलाही सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, google.com ऑर्डर ग्राहकांना ऑर्डर आणि पेमेंट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. सध्या गुगलतर्फे मेन्यू, किंमत आणि अन्य बाबींवर विचार करण्यात येत आहे.
अमेरिकेत सध्या गुगलची खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सुविधा सुरू आहे. व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंटच्या मदतीने ग्राहकांना ऑर्डर करण्याचा ऑप्शन देण्यात येत आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी खाद्यपदार्थ डिलिव्हरी सेवेमध्ये गुगलचा प्रवेश गेमचेंजर ठरण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. तसेच गुगलमुळे स्विगी आणि झोमॅटोला देखील टक्कर मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननेही नुकतीच देशात फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. कंपनीने बंगळूरूच्या काही भागात ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! हादरवणाऱ्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक https://t.co/9wJqNWKxAx#coronavirus#CoronaUpdates
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2020
अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच झालं नाही तयार शेवटी...; मन सुन्न करणारी घटनाhttps://t.co/A4XTya65al#Corona#coronavirus#Death
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार
बापरे! माकडांमुळे 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! 100 तासांत तब्बल 10 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी
अरे व्वा! 'या' मेड इन इंडिया अॅपने सुरू केला जबरदस्त शो; युजर्सना तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी
...अन् भाजपाच्या नगरसेविकेने भर सभेत आयुक्तांना फेकून मारली चप्पल, Video व्हायरल
CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यात यश! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने लगावला आनंदाचा 'सिक्सर'