Google तुम्हाला करु शकतं मालामाल, फक्त एक काम करा आणि २५ लाख जिंका!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 03:52 PM2022-09-07T15:52:57+5:302022-09-07T15:54:43+5:30

गुगल तुम्हाला लखपती होण्याची संधी देत आहे. यासाठी कंपनीनं बग बाऊंटी प्रोग्रामची घोषणा केली आहे.

google launches new bug bounty program will reward rs 25 lakh | Google तुम्हाला करु शकतं मालामाल, फक्त एक काम करा आणि २५ लाख जिंका!

Google तुम्हाला करु शकतं मालामाल, फक्त एक काम करा आणि २५ लाख जिंका!

googlenewsNext

नवी दिल्ली-

गुगल तुम्हाला लखपती होण्याची संधी देत आहे. यासाठी कंपनीनं बग बाऊंटी प्रोग्रामची घोषणा केली आहे. यात जर तुम्ही ओपन सोर्स सॉफ्टवेअर Google OSS मध्ये त्रृटी शोधून दाखवली तर जवळपास २५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात तुम्ही जिंकू शकता. एका रिपोर्टनुसार Google OSS मध्ये त्रृटी शोधू दाखवणाऱ्याला कंपनीकडून ३१,३३७ डॉलर म्हणजेच जवळपास २५ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

गुगलकडून दिलं जाणारं बक्षीस हे १०० डॉलरपासून ३१,३३७ डॉलरपर्यंत असणार आहे. तुम्ही शोधून काढलेल्या चूक किती गंभीर स्वरुपाची आहे त्यावर तुम्हाला दिलं जाणाऱ्या बक्षीसाची रक्कम ठरणार आहे. गुगलनं ओपन सोर्स सॉफ्टवेअर वल्नरेबिलिटी रिवॉर्ड प्रोग्राम लॉन्च करताना या बग बाऊंटी प्रोग्रामची घोषणा केली आहे. 

गुगलनं दिलेल्या माहितीनुसार रिवॉर्ड महत्वाची चूक शोधून काढणाऱ्याला दिलं जाईल. कंपनीनं यात टॉप अवॉर्ड सेंसिटिव्ह प्रोजेक्ट सारख्या Bazel, Angular, Golang, Protocol Buffers आणि Fuchsia मध्ये त्रृटी शोधून दाखवणाऱ्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. 

Google च्या OSS VRP नं प्रामुख्यानं सिक्युरिटी अडचणींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यात सॉफ्टवेअर सप्लाय चेनला धोका पोहोचवणाऱ्या सुरक्षेत त्रृटींचा शोध घेतला जाणार आहे. डिझाइन फ्लो किंवा सिक्युरिटी फ्लोमुळे क्रेडेंशियल तसंच कमकुवत पासवर्ड हॅक केले जाऊ नयेत यासाठी कंपनीनं बग बाऊंटी हंटर्सना बग्ज शोधून काढण्यासाठी निमंत्रीत केलं आहे. 

गुगलकडून जारी करण्यात आलेल्या या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आणि नियम काळजीपूर्वक वाचून घेण्याची सूचना कंपनीकडून करण्यात आली आहे. त्यानंतर हॅकिंग करण्याचा प्रयत्न करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. यात एखादी त्रृटी आढळून आली तर त्याबाबतची माहिती देण्यास सांगितलं आहे.  

Web Title: google launches new bug bounty program will reward rs 25 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल