गुगल पिक्सलचे दोन स्वस्तातले प्रिमिअम फोन लाँच; देणार वनप्लस 7 ला टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:41 PM2019-05-08T13:41:54+5:302019-05-08T13:45:34+5:30
अँड्रॉईडची जन्मदाता कंपनी गुगलने काही वर्षांपूर्वी मोटोरोला विकत घेत स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल रोवले होते. मात्र, नंतर ही कंपनी लिनोव्होला विकत पिक्सल ही महागडी मोबाईलची मॉडेल लाँच केली होती.
अँड्रॉईडची जन्मदाता कंपनी गुगलने काही वर्षांपूर्वी मोटोरोला विकत घेत स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल रोवले होते. मात्र, नंतर ही कंपनी लिनोव्होला विकत पिक्सल ही महागडी मोबाईलची मॉडेल लाँच केली होती. या फोनमध्ये गुगलचे लेटेस्ट फिचर्स आणि कॅमेरा ही या फोनची खासियत होती. मात्र, किंमत जास्त असल्याने ते खूपच कमी विकले गेले. यामुळे मोठ्या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने परवडणाऱ्या प्रिमिअम श्रेणीतील फोन पिक्सल 3a आणि 3a XL लाँच करण्यात आले आहेत.
महागडे पिक्सल 3 आणि 3XL या आणि नव्या फोनचे स्पेसिफिकेशन जवळपास एकसारखेच आहेत. केवळ काही फिचर्स आणि स्क्रीनसाईज हे वेगवेगळे देण्यात आले आहेत. या फोनची विक्री 15 मे पासून सुरु होणार आहे. तर वनप्लस 7 चे लाँचिंग 14 मे रोजी आहे.
पिक्सल 3a ची किंमत 39999 रुपये आणि 3a XL ची किंमत 44,499 रुपये आहे. या फोनची प्री बुकिंग 8 मे पासून फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे.
गूगल पिक्सल 3a मध्ये 5.6 इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्युशन 2220 x 1080 पिक्सल आहे. यामध्ये GPU अॅड्रीनो 615 आहे. तर पिक्सल 3a XL मध्ये 6 इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्युशन 2160 x 1080 पिक्सल आहे. सुरक्षेसाठी ड्रॅगन ट्रायल ग्लास देण्यात आली आहे.
दोन्ही फोनमध्ये प्रोसेसर आणि रॅम सारखीच आहे. स्नॅपड्रॅगन 670 ऑक्टा-कोर 2.0 GHz प्रोससर आणि 4 जीबी रॅम आहे. तसेच इंटरनल स्टोरेज 64 जीबी आहे. अँड्रॉईड 9.0 ही ऑपरेटिंग सिस्टिम असली तरीही नवीन अँड्रॉईड क्यू लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
कॅमेरा
दोन्ही फोनमध्ये 12.2 मेगापिक्सलचा ड्युअल पिक्सल सोनी IMX363 सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS + EIS फिचर आहेत. यामध्ये ड्युअल-पिक्सल फेज डिटेक्शन, ऑप्टिकल + इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलाइजेशन ही फिचर्स देण्यात आली आहेत. कॅमेरा f/1.8 अपर्चरचा असून नाइट साइट, पोर्ट्रेट मोड सारखे फिचर्स आहेत. पुढील बाजुला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
गुगलच्या 3a मध्ये 3000 mAh आणि 3a XL मध्ये 3700mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जरला सपोर्ट करते. 15 मिनिटांचे चार्जिंग केल्यास हा फोन 7 तास चालणार आहे. तर पूर्ण चार्ज केल्यास हा फोन 30 तास चालू शकणार आहे. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे. फोटो सेव्ह करण्यासाठी गुगल सर्व्हरवर अनलिमिटेड स्पेस देते.